Rakhi Sawant Arrested: राखी सावंतची साडेसाती थांबेना... पोलिसांनी केली अटक.

अभिनेत्री राखी सावंतला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
Rakhi Sawant Arrested
Rakhi Sawant ArrestedDainik Gomantak

गेले काही दिवस अभिनेत्री राखी सावंत सलग चर्चेत आहे. म्हैसुरचा उद्योगपती आदिल खान दुर्राणी याच्याशी झालेल्या लग्नावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.

आता राखी पुन्हा एकदा नव्या अडचणीत सापडली आहे. (Rakhi Sawant Arrested)

मिळालेल्या माहितीनुसार राखीने एका मॉडेलचे फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट केल्याचा आरोप राखीवर करण्यात आले आहेत. या प्रकरणात तिला थोड्याच वेळापूर्वी अंबोली पोलिसांनी अटक केली आहे.

अभिनेत्री आणि मॉडेल शर्लीन चोप्राचे फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट केल्याबद्दल केलेल्या तक्रारीवरून ही अटक करण्यात आली आहे.

Rakhi Sawant Arrested
'हर घर तिरंगा' वर काँग्रेसला कसली आपत्ती? | Why does congress cry on 'Har Ghar Tiranga' |Gomantak Tv

सतत काहीतरी वादग्रस्त करुन चर्चेत राहणारी राखी सावंत आता प्रकरणात फसणार असं वाटतंय. बघुया या प्रकरणात आता काय पाहायला मिळतं? याबाबतचे सविस्तर वृत्त थोड्याच वेळात मिळेल.

काही दिवसांपूर्वी इंन्स्टाग्रामवर सुरू असलेल्या राखीच्या ड्रामाला आता कुठे ब्रेक मिळाला होता. माझा नवरा मला स्वीकारत नाही, असं म्हणुन राखीने सुरू केलेला ड्रामा आता कुठे थांबला होता.

राखीच्या नवऱ्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत सगळं ठीक असल्याचं सांगितलं होतं. इतक्यात राखीचा नवा पराक्रम समोर आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com