Shehzade Trailor : कार्तिक - क्रितीच्या 'शहजादे'चं ट्रेलर रिलीज,नेटीजन्स एवढे का खुश?

लुका- छुप्पी या चित्रपटानंतर आता कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.
Kartik Aryan 
Kriti sanon
Kartik Aryan Kriti sanon Dainik Gomantak

बॉलिवूडचा हॅंडसम हिरो कार्तिक आर्यन आणि त्याची परफेक्ट केमिस्ट्री क्रिती सेनन आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत

'लुका छुपी' नंतर कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन नव्या चित्रपटासह एकत्र येत आहेत. यावेळी ते 'शेहजादा' या चित्रपटात सोबत दिसतील. 

या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, अल्लू अरविंद आणि अमन गिल हे आहेत . रोहित धवन याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या आगामी 'शहजादा'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. अवघ्या काही मिनिटांचा हा ट्रेलर प्रेक्षकांनी खूप एन्जॉय केला आहे. 

 हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या 'आला वैकुंठप्रेमुलु'चा बॉलीवूड रिमेक आहे आणि नेटिझन्सच्या मते हा चित्रपट ब्लॉकबस्टर असणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवर ट्विटरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

ट्रेलर रिलीज झाल्यानंतर लगेचच चाहत्यांनी कार्तिक आर्यनला ट्रेंड करायला सुरुवात केली. एक यूजर म्हणतो की, "कार्तिक आर्यन या चित्रपटात छान दिसत आहे.त्याचा चित्रपट पुन्हा एकदा पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे"

Kartik Aryan 
Kriti sanon
Rakhee Sawant: राखी सावंतच्या लग्नावर लव्ह जिहादचं सावट?

 एकाने लिहिले, 'कार्तिक आर्यन व्वा हे माझ्यासाठी सर्वोत्तम वर्ष आहे. या चित्रपटासाठी कार्तिकपेक्षा चांगला कोणीच असू शकत नाही.

 त्याच्या चित्रपटांच्या निवडीविषयी कौतुक करताना एका चाहता लिहितो की, 'कार्तिकने स्क्रिप्ट्स हुशारीने निवडल्या आहेत आणि आता शहजादाही हिट होणार आहे.

आणि आम्हाला हा चित्रपट आवडेल.' थोडक्यात नेटीझन्सनी या चित्रपटाला हिट करण्याचा विडा आता उचलला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com