'पाताल लोक' मध्ये दिसणार बॉलीवुडची बेबो

करीना कपूर ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
Kareena Kapoor Khan News, Paatal Lok web series news, Entertainment news, latest web series news
Kareena Kapoor Khan News, Paatal Lok web series news, Entertainment news, latest web series newsInstagram/@Kareena Kapoor Khan
Published on
Updated on

बॉलीवुडमध्ये धमाल केल्यानंतर अभिनेत्री करीना कपूर आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी सज्ज झाली आहे. करीनाने (Kareena Kapoor Khan) सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करून तिच्या ओटीटी (OTT) पदार्पणाची माहिती दिली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर करीनाच्या आगमनाची बातमी मिळताच तिचे चाहते खुश झाले आहेत. या प्रोजेक्टमध्ये करीना पातल लोक फेम जयदीप अहवालासोबत काम करणार आहे. करीनानेही तीच्या नव्या प्रोजेक्टची तयारी सुरू केली आहे, ज्यांचा व्हिडिओ तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट बेस्ट सेलर चित्रपटाचे रूपांतर असणार आहे. (Paatal Lok web series news Updates)

या व्हिडिओमध्ये (Video) करीना स्क्रिप्ट वाचताना दिसत आहे. यासोबतच त्याने चित्रपटाच्या (Movie) टीमसोबतच एक फोटोही शेअर केला आहे. या चित्रपटात करीना आणि जयदीपसोबत विजय वर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुजॉय घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट शेअर करत तिने लिहिले- आणि ते सुरू झाले.. करीनाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटीनी कमेंट करून तिचे अभिनंदन केले आहे. हार्ट इमोजी पोस्ट करत तान्या गरवीने लिहिले- या चित्रपटासाठी आम्ही उत्सुक आहोत.

Kareena Kapoor Khan News, Paatal Lok web series news, Entertainment news, latest web series news
द काश्मीर फाईल्सने बॉलिवूडचे सर्व पाप धुवून टाकले आणि...

* करीनाच्या या पोस्टवर चाहत्यांनी केला कमेंटचा वर्षाव

करीनाचे अनेक चाहते तिच्या पोस्टवर कमेंट आणि लाईक्साचा वर्षाव करत आहेत. अनेकजन तिचे कौतुक देखील करत आहेत. चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे.करीना लवकरच आमिर खानसोबत लाल सिंग चड्ढा या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएथरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com