द काश्मीर फाईल्सने बॉलिवूडचे सर्व पाप धुवून टाकले आणि...

अभिनेत्री कंगना रणौतचा इंडस्ट्रीतल्या इतर कलाकारांना टोला
Kangana Ranaut
Kangana RanautDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Kangana Ranaut: नुकताच प्रदर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय बनला आहे. यावर अनेकांनी आपली मते देऊन चित्रपटाचे कौतुक केले आहे. पाहिल्यानंतर बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनेदेखील कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'द काश्मीर फाईल्सने बॉलिवूडचे सर्व पाप धुवून टाकले, असे ती म्हणाली. यावेळी तिने इंडस्ट्रीतल्या इतर कलाकारांनाही टोला लगावला. उंदरासारखे बिळात लपून बसलेल्यांनी बाहेर यावे आणि या चित्रपटाचे प्रमोशन करावे, अशा शब्दांत तिने बॉलिवूडकरांना टोमणा मारला आहे.

'द काश्मीर फाईल्सच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. त्यांनी पूर्ण फिल्म इंडस्ट्रीचे जेवढे पाप होते, ते सर्व पाप धुवून टाकले आहेत. बॉलिवूडचेही पाप त्यांनी धुवून टाकले. हा चित्रपट इतका कौतुकास्पद आहे की जे इंडस्ट्रीवाले आपल्या बिळात लपून बसले आहेत, त्यांनी बाहेर येऊन याचं प्रमोशन केले पाहिजे. नेहमी ते बकवास, सडलेल्या चित्रपटांचे प्रमोशन करतात', असे ती म्हणाली. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com