T20 WC: न्यूझीलंडने मारली बाजी, T20 WC 2022 च्या उपांत्य फेरीत 'धडक'

T20 World Cup 2022: T20 विश्वचषक 2022 सुपर-12 मधील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने आयर्लंडचा 35 धावांनी पराभव केला.
New Zealand
New ZealandDainik Gomantak
Published on
Updated on

T20 World Cup 2022: T20 विश्वचषक 2022 सुपर-12 मधील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने आयर्लंडचा 35 धावांनी पराभव केला. या विजयासह केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आयर्लंडच्या पराभवासह, किवी संघाचे आता 5 सामन्यांतून 7 गुण झाले आहेत. न्यूझीलंड हा सुपर-12 मधील पहिला संघ आहे, ज्याने 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे.

दरम्यान, संघ अद्याप अधिकृतपणे पात्र ठरला नसला तरी, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा प्रत्येकी एक सामना असल्याने आणि या संघांनी आपापले सामने जिंकल्यास नेट रनरेट पाहिला जाईल. न्यूझीलंडचा नेट रन रेट +2.113 आहे, जो ऑस्ट्रेलिया (-0.304 ) आणि इंग्लंड (+0.547) पेक्षा खूपच चांगला असला तरी, न्यूझीलंड (New Zealand) हा उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे.

तसेच, आयर्लंडविरुद्ध (Ireland) प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 6 गडी गमावून 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात चांगली सुरुवात करुनही आयर्लंडला 20 षटकांत 9 गडी गमावून 150 धावाच करता आल्या. 186 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडच्या संघाने दमदार सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये संघाने 6 षटकांत एकही विकेट न गमावता 39 धावा केल्या होत्या.

New Zealand
T20 WC: टीम इंडिया आफ्रिकेशी भिडणार, केएल राहुलच्या जागी कोण? प्रशिक्षकाने दिले उत्तर

दुसरीकडे, 25 चेंडूत 30 धावा केल्यानंतर बालबर्नी क्लीन बोल्ड झाला आहे. मिचेल सँटनरने त्याला बाद केले. पहिली विकेट पडल्यानंतरही आयर्लंडच्या विकेट्स पडतच राहिल्या. आयर्लंडकडून पॉल स्टर्लिंगने 37 धावा केल्या. कर्णधार बलबर्नी 30 धावा करुन बाद झाला. जॉर्ज डॉकरेलने 23 धावा केल्या. न्यूझीलंडकडून लॉकीने 3, साऊथी, सँटनर, सोढीने 2-2 बळी घेतले.

तत्पूर्वी, फॉर्ममध्ये परतलेल्या केन विल्यमसनने (Kane Williamson) 35 चेंडूत 61 धावा केल्या, परंतु आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटलने शुक्रवारी टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात न्यूझीलंडला सहा बाद 185 धावांवर रोखून संस्मरणीय हॅट्ट्रिक साधली. विल्यमसनने स्पर्धेत प्रथमच शंभरच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि तीन षटकार मारले.

New Zealand
Ind vs Aus T20 WC: सराव सामन्यात भारताकडून कांगारू पराभूत, शमीने मैदान मारले

शिवाय, सलामीवीर फिन ऍलनने 18 चेंडूत 32, ग्लेन फिलिप्सने नऊ चेंडूत 17 आणि डॅरिल मिशेलने 21 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. डावखुरा वेगवान गोलंदाज लिटिलने डेथ ओव्हर्समध्ये न्यूझीलंडचा रनरेट रोखला. 19 व्या षटकात त्याने सलग तीन चेंडूंवर विल्यमसन, जिमी नीशम आणि मिचेल सँटनरचे बळी घेतले. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विल्यमसन झेलबाद झाला तर नीशम आणि सॅंटनर लेग बिफोर बाद झाले. संयुक्त अरब अमिरातीच्या कार्तिक मयप्पननंतरची ही विश्वचषकातील दुसरी हॅट्ट्रिक ठरली. कार्तिकने श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) हा पराक्रम केला होता.

New Zealand
T20 WC: नामिबियाचा श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय; सचिनच्या प्रतिक्रियेवर नामिबियाच्या कप्तानचे उत्तर

त्याचबरोबर, न्यूझीलंडच्या डावातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे विल्यमसनचे फॉर्ममध्ये परतणे. सुरुवातीला संघर्ष केल्यानंतर तो मुक्तपणे खेळला. त्याने वेगवान गोलंदाज बॅरी मॅकार्थीला डीप मिडविकेटवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. दोन चेंडूंनंतर त्याने त्याच जागी आणखी एक षटकार मारला. मात्र, पुन्हा असाच फटका खेळण्याच्या प्रयत्नात 19 व्या षटकात तो झेलबाद झाला. न्यूझीलंड 200 धावांचा टप्पा ओलांडणर असं दिसत असताना शेवटच्या दोन षटकात आयर्लंडने केवळ 12 धावा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com