Chandramukhi 2 : कंगनाच्या चंद्रमुखीचा जोर बॉक्स ऑफिसवर चालेना...

अभिनेत्री कंगना रणौतचा चंद्रमुखी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत वेगाने खाली जाताना दिसत होते.
Chandramukhi 2
Chandramukhi 2 Dainik Gomantak
Published on
Updated on

Kangna Ranaut's Chandramukhi Box Office Collection : अभिनेत्री कंगना रणौतचा चित्रपट चंद्रमुखी बॉक्स ऑफिसवर आपला जोर दाखवण्यात पुरता कमी पडला आहे. चित्रपटाची कमाई पाचव्या दिवशी अजिबात समाधानकारक दिसत नाही. चला पाहुया या चित्रपटाचं 5 व्या दिवसाचं कलेक्शन किती आहे?

चंद्रमुखीचा बॉक्स ऑफिस कलेक्शन

कंगनाचा तमिळ भाषेतील चित्रपट चंद्रमुखी-2 बॉक्स ऑफिसवर यापूर्वीच प्रदर्शित झाला आहे. रविवारपर्यंत चांगला व्यवसाय करणाऱ्या चंद्रमुखी-2 च्या कलेक्शनमध्ये सोमवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर लक्षणीय घट झाली. जाणून घ्या चंद्रमुखी-२ ची भारत आणि जगभरातील कमाई.

सुरूवातीचे कलेक्शन

पी वासू दिग्दर्शित या चित्रपटात कंगना रणौतने प्रथमच साऊथ स्टार अभिनेता आणि दिग्दर्शक राघव लॉरेन्ससोबत स्क्रीन स्पेस शेअर केली आहे. 

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चार दिवस चांगला व्यवसाय केला, मात्र आता सोमवारी म्हणजे पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

चंद्रमुखी

कंगना राणौतचा हा चित्रपट 28 सप्टेंबरला तमिळ आणि तेलुगू तसंच हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला. 

मात्र, हिंदीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तितका गदारोळ माजवू शकला नाही ज्याची चाहत्यांना या चित्रपटाकडून अपेक्षा होती. 'चंद्रमुखी 2' बॉक्स ऑफिसवर तमिळ भाषेत उत्तम व्यवसाय करत आहे.

चंद्रमुखीने केली इतकी कमाई

मात्र, सुट्टी असूनही या चित्रपटाच्या सोमवारच्या कलेक्शनमध्ये घट झाली आहे. Sanlic.com च्या वृत्तानुसार, रविवारी एकाच दिवशी तमिळ भाषेत एकूण 5.45 कोटी रुपये कमावणाऱ्या या चित्रपटाने सोमवारी एका दिवसात केवळ 3.56 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

तमिळ भाषेतील या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 22.04 कोटींवर पोहोचले आहे. याशिवाय सोमवारने हिंदीत केवळ 2 लाखांची कमाई केली असून चित्रपटाची एकूण कमाई 57 लाखांवर पोहोचली आहे.

Chandramukhi 2
Sridevi : लग्नाआधीच प्रेग्नेंट होत्या 'श्रीदेवी'? बोनी कपूर यांनी सांगितलं ते सत्य...

चंद्रमुखीचं कलेक्शन

याशिवाय 'चंद्रमुखी-2'ने सोमवारी तेलुगू भाषेत 87 लाखांचा व्यवसाय केला. कंगना रणौत आणि राघव लॉरेन्स यांच्या प्रादेशिक भाषेतील चित्रपटाचे एकूण कलेक्शन 6.27 कोटी रुपये आहे.

या आकडेवारीनुसार, चित्रपटाने आतापर्यंत सर्व भाषांसह देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर पाच दिवसांत 28.88 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. याशिवाय चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन 34.7 कोटींवर पोहोचले आहे. 'चंद्रमुखी-2'चे परदेशात कलेक्शन 6 कोटींवर पोहोचले आहे.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com