कंगनाच्या तेजसची पहिल्या दिवशी जेमतेम कमाई, ओपनिंग कलेक्शन जाणून घ्या

अभिनेत्री कंगना रणौतच्या तेजस या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जेमतेम कमाई केली आहे.
Kangana Ranaut
Kangana RanautDainik Gomantak
Published on
Updated on

Kangana's Tejas day 1 box office collection : अभिनेत्री कंगना रणौैतच्या नुकत्याच रिलीज झालेल्या तेजस या चित्रपटाची सध्या सोशल मिडीयावर चर्चा सुरु आहे. रिलीज झाल्यापासून हा चित्रपटाचा पहिला दिवस. इंडस्ट्रीत चित्रपटाच्या रिलीजच्या पहिल्या दिवसाला विशेष महत्त्व असते.

चित्रपटाचं ओपनिंग अत्यंत महत्त्वाचं असतं त्यावरुनच चित्रपटाच्या एकूण कमाईचा अंदाज बांधला जातो.

पहिल्या दिवसाचे कलेक्शन

 कंगना रणौतच्या बहुप्रतिक्षित एरियल अॅक्शन चित्रपटाला त्याच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. Sacnilk.com ने शेअर केलेल्या सुरुवातीच्या अंदाजानुसार चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ₹ 1.25 कोटी कमावले .

तेजसची कथा

तेजसची कथा हवाई दलाचे वैमानिक तेजस गिलच्या विलक्षण प्रवासाभोवती फिरते आणि प्रत्येक भारतीयाला प्रेरणा आणि अभिमानाची भावना जागृत करण्याचे उद्दिष्ट दाखवण्यात आले आहे, भारतीय हवाई दलाचे वैमानिक आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी, वाटेत असंख्य आव्हानांना तोंड देत कसे अथक परिश्रम घेतात हेच या चित्रपटात दाखवले आहे. चित्रपटात कंगना ओलिसांना दहशतवाद्यांपासून सोडवण्याच्या मिशनवर जाते.

कंगनाचं ट्वीट

चित्रपटाचा लोकप्रिय डायलॉग "छेडोगे तो छोडेंगे नही (तुम्ही आमच्याशी पंगा घेतला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही)" या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कंगनाने वापरला होता. 

एका इंटरनेट यूजरने एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान अशीच एक ओळ म्हटल्याची क्लिप शेअर केली होती आणि तेजसच्या दिग्दर्शकाला त्याचे श्रेय पंतप्रधानांना देण्यास सांगितले होते. या ट्विटला उत्तर देताना कंगनाने लिहिले होते की, “हा श्रेय निश्चितपणे द्यावं लागेल”

Kangana Ranaut
Lalu Prasad Movie: लालू प्रसाद यादव यांच्यावर बनतोय चित्रपट, प्रकाश झा दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा

तेजस

तेजसला समीक्षकांकडून संमिश्र तसेच सकारात्मक प्रतिसाद मिळाले आहेत. कंगना राणौत नावाची व्यक्तिरेखा एक महिला एअरफोर्स पायलट म्हणून प्रेरणादायी वाटते , तिला अधूनमधून वायुसेनेमध्ये किंवा समाजात एक मुक्त विचारसरणी आणि एक धाडसी स्त्री म्हणून तिचे स्थान सिद्ध करावे लागते, अंशुल चौहान यांनी रूपकात्मक प्रकारे अगदी अचूकपणे मांडले आहे. तेजसचे धाडस आणि आवेग, कपट, संयम आणि थोडंसं फिल्मी नाटक.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com