Kamal Hasan's indian 2 updates
Kamal Hasan's indian 2 updatesDainik Gomantak

चित्रपट कमल हासनचा चर्चा मात्र आमिर खानची...आगामी इंडियन 2 चर्चेत

अभिनेता कमल हासन यांचा इंडियन 2 हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे.
Published on

Kamal Hasan's indian 2 updates : गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान इंडस्ट्रीच्य़ा चर्चांपासून दूर आहे. आमिरचा शेवटचा चित्रपट लाल सिंह चढ्ढानंतर त्याने काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता आमिर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे

नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार आमिर खान आता इंडियन 2 या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

कमल हासनचा इंडियन 2

सध्या अभिनेता कमल हासनचा आगामी चित्रपट 'इंडियन 2' चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. 3 नोव्हेंबर 2023 रोजी 'इंडियन 2' ची पहिली झलक दाखवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले . अशा परिस्थितीत चाहत्यांमध्ये याबाबत प्रचंड क्रेझ आहे.

आमिर शेअर करणार...

आता या चित्रपटाची पहिली झलक सुपरस्टार आमिर खानच प्रदर्शित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इंडियन'चा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात कमल हासनसोबत मनीषा कोईराला आणि उर्मिला मातोंडकर देखील दिसल्या होत्या , जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

इंडियन 2 चं इन्ट्रो़डक्शन

प्रॉडक्शन हाऊस लायका प्रॉडक्शनने त्यांच्या सोशल मीडिया हँडल X वर ट्विट केले आहे की 'इंडियन 2' च्या हिंदी रिलीजची पहिली झलक इतर कोणीही नाही तर आमिर खान दाखवणार आहे . 

त्याचे ट्विट शेअर करताना लिहिले आहे की, 'जेव्हा परिपूर्णता उत्कटतेने पूर्ण होते, तेव्हा आम्ही स्फोटासाठी तयार असतो. 'मिस्टर परफेक्शनिस्ट' उलगनायगन उद्या संध्याकाळी 5:30 वाजता कमल हासन आणि एस शंकर यांच्या 'इंडियन 2' ची ओळख प्रदर्शित करेल .

Kamal Hasan's indian 2 updates
"कपड्यांच्या दुकानातही एवढीच कमाई होते" कंगनाचा तेजस फ्लॉप होताच यूजर्सकडून ट्रोलींग सुरु

साऊथच्या सुपरस्टार्सची झलक

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार यासोबतच तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड सुपरस्टार रजनीकांत, एसएस राजामौली, मोहनलाल आणि किच्चा सुदीपा यांची झलक आपापल्या भाषांमध्ये दाखवण्यात येणार असल्याची माहितीही प्रॉडक्शन हाऊसने दिली आहे.

चित्रपटाविषयी

एस. शंकर दिग्दर्शित कमल हासनच्या 'इंडियन 2'ची निर्मिती उदयनिधी स्टॅलिन आणि ए सुबास्करन यांनी केली आहे. 

या चित्रपटात काजल अग्रवाल, नेदुमुदी वेणू, गुरु सोमसुंदरम, बॉबी सिम्हा, सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंग, प्रिया भवानी शंकर यांच्यासह अनेक स्टार्स दिसणार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 

त्याचबरोबर या चित्रपटातील गाणी ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीतबद्ध केली आहेत.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com