Birthday Special: काजोल का घालते ही खास अंगठी? जाणून घ्या

उत्कृष्ट अभिनयामुळे काजोलला (Kajol) 2011 मध्ये भारत सरकारने 'पद्मश्री' (Padma Shri) देऊनही सन्मानित केले होते.
Kajol entered the screen at the age of 16
Kajol entered the screen at the age of 16Dainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूड ( Bollywood) अभिनेत्री काजोलला (Kajol) तिच्या उत्कृष्ट अभिनयामुले चाहते तिला ओळखतात. काजोल नेहमी हसतमुख आणि हसताना दिसते. किती वेळा अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावले आहे. 5 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज काजोल तिचा वाढदिवस साजरा करत आहे. काजोलने तिच्या कारकिर्दीत सर्व प्रकारचे चित्रपट चाहत्यांसमोर सादर केले आहेत. (Kajol entered the screen at the age of 16)

उत्कृष्ट अभिनयामुळे काजोलला 2011 मध्ये भारत सरकारने 'पद्मश्री' (Padma Shri) देऊनही सन्मानित केले होते. काजोल अशी एक अभिनेत्री आहे जिने आतापर्यंत प्रमुख भूमिकेत 6 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. अशा परिस्थितीत, काजोलच्या वाढदिवशी, आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल आणखी काही रोचक गोष्टी सांगतो.

Kajol entered the screen at the age of 16
Bell Bottom चित्रपटासाठी लारा दत्ता बनली इंदिरा गांधी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोलचा जन्म 5 ऑगस्ट 1974 रोजी मुंबईत झाला. काजोलची आई तनुजा एक प्रसिद्ध अभिनेत्री होती, त्यामुळे अभिनय तिच्या शिरामध्ये आधीच स्थिरावला होता. अभिनेत्री काजोलचे शालेय शिक्षण पाचगणीतील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेत झाले. काजोलला सुरुवातीपासूनच नृत्याची खूप आवड होती. अशा परिस्थितीत असे म्हटले जाते की अभ्यास टाळण्यासाठी अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या दिशेने पाऊल टाकले होते.

लहान वयातच केली करियरची सुरुवात

साध्या दिसणाऱ्या काजोलने हिंदी चित्रपटांचा प्रवास 'बेखुदी' चित्रपटाने सुरू केला. काजोलने जेव्हा सिनेसृष्टीत पदार्पण केले तेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती. मात्र, काजोलला या चित्रपटातून विशेष यश मिळाले नाही. या चित्रपटानंतर काजोलला 'बाजीगर' चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली, ज्यात ती शाहरुख खान सोबत दिसली.या चित्रपटाने काजोलला रातोरात स्टार बनवले.

Kajol entered the screen at the age of 16
27 Years OF Hum Aapke Hain Kaun: चित्रपटाविषयी जाणून घ्या रंजक गोष्टी

प्रेमाची सुरुवात अजयपासून झाली

लाखो हृदयावर राज्य करणाऱ्या काजोलचे हृदय सुपरस्टार अजय देवगणवर (Ajay Devgan) आले. अजयसोबत काजोलची पहिली भेट 'गुंडाराज' चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. दोघेही चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातून दोघेही चांगले मित्र झाले. नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. काजोलने 24 फेब्रुवारी 1999 रोजी अजयशी लग्न केले, त्यांना मुलगी न्यासा आणि मुलगा युग आहे.

शाहरुख सोबत जोडी

काजोलची शाहरुखसोबत अशी जोडी आहे, जी प्रत्येकाला आवडते. चाहत्यांना हे दोन कलाकार एकत्र बघायला आवडतात. या जोडीने अनेक बॉलिवूड सुपरहिट चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 'बाजीगर' पासून ते 'करण अर्जुन', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम','माई नेम इज खान' सारखे सुपरहिट चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे.

Kajol entered the screen at the age of 16
हनी सिंगची पत्नी शालिनीने सासऱ्यावर केले गंभीर आरोप

मीडिया रिपोर्टनुसार, काजोलला कविता लिहिणे आणि विज्ञानावर आधारित भितीदायक नोबेल वाचणे खूप आवडते. कामाच्या दरम्यान वेळ मिळाल्यावर ती अनेकदा काहीतरी वाचत राहते. एवढेच नाही तर असे म्हटले जाते की काजोलकडे 'ओम' लिहिलेली हिऱ्याची अंगठी आहे, जी ती नेहमी परिधान करते. पती अजयने काजोलला 'इश्क' चित्रपटाच्या सेटवर एंगेजमेंट रिंग म्हणून ही अंगठी घातली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com