TMKOC या मालिकेचा 'जेठालाल' घेतो सर्वाधिक मानधन

'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेत (series) दिसणाऱ्या कलाकरांना चाहते त्यांच्या पात्राच्या नावाने ओळखतात.
Jethalal Champaklal Gada
Jethalal Champaklal GadaDainik Gomantak

'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही एक प्रसिद्ध टीव्ही मालिका आहे. या मालिकेतील सर्व कलाकार घरोघरी पोहोचले आहेत. मालिकेत दिसणाऱ्या कलाकरांना चाहते त्यांच्या पात्राच्या नावाने ओळखतात. जेठालाल उर्फ दिलीप जोशी याआधी चित्रपट आणि अनेक मालिकांमध्ये दिसले आहेत, पण 'तारक मेहता' या मालिकेतून दिलीप जोशी यांना प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांना मिळालेल्या लोकप्रियतेमुळेच ते या मालिकेचे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहे.

Jethalal Champaklal Gada
'किन्नर बहू' च्या डोक्याहून गोवा व्हॅकेशनच भूत काही उतरेना

मालिकेतून लोकप्रियता मिळाली

दिलीप जोशी यांनी 90 च्या दशकातील 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'खिलाडी 420' यासारख्या अनेक चित्रपाटांमध्ये काम केले आहे. याशिवाय 'क्या बात है', 'दो और दो चार', 'दाल मे काला', 'सीआईडी', 'कोरा कागज', या मालिकांमध्ये त्यांनी विशेष कामगिरी बजावली आहे. पण 'तारक का मेहता का उल्टा चश्मा' या मलिकेतून त्यांना भरपुर लोकप्रियता, प्रसिद्धी आणि पैसा मिळाला आहे.

जेठालालची फी किती ?

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतून अंदाजे त्यांनी 37 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच या मालिकेमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. ते प्रत्येक एपिसोडचे 1.5 लाख रुपये घेतात.

Jethalal Champaklal Gada
Chehre: अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी पहिल्यांदाच एकत्र, चित्रपट थिएटरमध्ये होणार रिलीज

गेल्या महिन्यात, दिलीप जोशी यांचे या मालिकेतील कलाकांसोबत मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दिलीप जोशी (जेठालाल) आणि शैलेश लोढा (तारक) यांच्यात वाद झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु नंतर दिलीप जोशी यांनी स्वत:च या सर्व बातम्या चूकीच्या असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मला आमच्या मालिकेतील सर्व सहकाऱ्यांसोबत काम करताना खूप आनंद होत आहेत. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. असे त्यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com