महिलांच्या अधिकारावर बंदी घातल्याने तालिबान्यांवर भडकले जावेद अख्तर

प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) हे बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींपैकी एक आहेत जे सामाजिक-राजकीय विषयांवर बोलतात.
Javed Akhtar was furious when Taliban banned women's work
Javed Akhtar was furious when Taliban banned women's workDainik Gomantak

प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) हे बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींपैकी एक आहेत जे सामाजिक-राजकीय विषयांवर बोलतात. ते नेहमी आपले मत मोकळेपणाने बोलतात. गेल्या महिन्यात तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानचा (Afghanistan) ताबा घेतला. तेव्हापासून तालिबान नेते तिथल्या महिलांविरोधात नवे फर्मान काढत आहेत.

जावेद अख्तर नेहमीच तालिबान नेत्यांच्या आदेशाविरोधात टीका करतात. आता पुन्हा एकदा त्यांनी तालिबान नेत्यांच्या एका हुकुमावर आपला राग व्यक्त केला आहे. तसेच इस्लामिक संघटनांना त्याविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केले. त्यांनी सोशल मीडियावर तालिबानच्या हुकुमावर टीका केली ज्याने नोकरी करणाऱ्या महिलांना घरीच राहण्याचे आदेश दिले.

Javed Akhtar was furious when Taliban banned women's work
गणपती विसर्जनावर पोस्ट केल्याने शाहरुख खान झाला ट्रोल!

जावेद अख्तर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. याद्वारे ते अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडतात. जावेद अख्तर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लिहिले, 'अल जजीराने कळवले आहे की, काबूलच्या महापौरांनी सर्व कामगार महिला घरीच राहतील असे फर्मान जारी केले आहे, मला आशा आहे की सर्व इस्लामिक संघटनांनी याला विरोध करावा, कारण हे त्यांच्या धर्माच्या नावाने केले जात आहे. कुठे आहेत ते लोक जे कालपर्यंत तिहेरी तलाकच्या विरोधात ओरडत होते.

जावेद अख्तर यांचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गीतकाराचे चाहते आणि सर्व सोशल मीडिया वापरकर्ते त्यांच्या ट्विटला पसंती देत ​​आहेत. तसेच आपला अभिप्राय देत आहे. यापूर्वी जावेद अख्तर यांनी तालिबानचे समर्थन करणाऱ्या देशांवर आपला राग व्यक्त केला होता. ते म्हणाले की प्रत्येक लोकशाही सरकारने तालिबानला मान्यता देण्यास नकार दिला पाहिजे. त्याचबरोबर अफगाणिस्तानात महिलांच्या दडपशाहीसाठी तालिबानला विरोध केला पाहिजे.

जावेद अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'प्रत्येक सुसंस्कृत व्यक्ती, प्रत्येक लोकशाही सरकार, जगातील प्रत्येक सुसंस्कृत समाजाने तालिबानींना ओळखण्यास नकार दिला पाहिजे आणि अफगाणिस्तानात महिलांवर होणाऱ्या या प्रकारच्या अत्याचाराचा निषेध केला पाहिजे अन्यथा न्याय, माणुसकी आणि विवेक यासारखे शब्द विसरले पाहिजेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com