Case File against Sana khan
Case File against Sana khanDainik Gomantak

आर्यन खान प्रकरण पुन्हा चर्चेत...बिग बॉसची कंटेस्टंट सना खानवर 10 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला

अभिनेत्री सना खानवर 10 कोटी रुपयांचा मानहानी खटला भरल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.
Published on

Case File against Sana khan : बिग बॉस 17 नेहमी कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता बिग बॉसच्या एका कंटेस्टंटमुळे पुन्हा एकदा शो चर्चेत आला आहे. बिग बॉस 17 ची कंटेस्टंट सना खान सध्या एका कारणामुळे चर्चेत आली आहे.

10 कोटींच्या मानहानीचा गुन्हा दाखल

सन खान 'बिग बॉस 17' चा भाग झाल्यापासून ती चर्चेत आहे. सना अलीकडेच अडचणीत आली जेव्हा वकील आशुतोष दुबे यांनी तिच्या शोचा भाग असण्यावर आक्षेप घेतला आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे तिच्याविरुद्ध अधिकृत तक्रार देखील केली.

त्याचवेळी, आता हाय-प्रोफाइल सेलिब्रिटी वकील सना रईस खानवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फैजान अन्सारीने सनाच्या विरोधात 10 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.

सना आर्यनला भेटलीच नाही

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्धी मिळवण्यासाठी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या नावाचा वापर केल्याप्रकरणी फैजान अन्सारीने सनाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. 

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सना ओळखली जाते. मात्र, फैजानच्या दाव्यानुसार, सना शाहरुखच्या मुलाला कधीच भेटली नाही. 

सना आर्यनच्या नावाचा वापर करत आहे

मिळालेल्या माहितीनुसार, फैजानने अलीकडील मीडिया संवादात दावा केला की सनाने आर्यनचे प्रतिनिधित्व केले नाही तर कुप्रसिद्ध प्रकरणात इवान साहू या दुसर्‍या व्यक्तीचे प्रतिनिधित्व केले आहे. 

फैजानच्या मते, सना लोकप्रियतेसाठी आर्यनच्या नावाचा वापर करत आहे. रिपोर्टनुसार, फैजानने सांगितले की, सना स्वत:ला क्रिमीनल लॉयर म्हणू शकते, परंतु ती स्वत: एक फसवणूक आहे. 

Case File against Sana khan
The Railway Men : भोपाळ गॅस दुर्घटनेची भीषणता दाखवणाऱ्या 'द रेल्वे मेन'चा टीझर रिलीज

सनाच्या शोमध्ये सहभागी होण्याला विरोध

अमर उजालाच्या वृत्तानुसार, फैजानने सनाविरुद्धचा खटला मुंबई आयुक्तांकडे नेला कारण कोणताही वकील खटला घेण्यास तयार नव्हता. त्याचवेळी सनाविरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

सनाच्या शोमध्ये सहभागी होण्यास विरोध करताना वकील आशुतोष दुबे यांनी आक्षेप घेतला आणि ते म्हणाले की हे बार कौन्सिलने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन आहे. त्यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे अधिकृत तक्रारही केली होती. दुबे यांनी लिहिले आहे की उल्लंघन आहे.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com