Ira Khan Engagement: आमिर खानची लेक इराच्या एंगेजमेंटला 'या' बॉलिवुड सेलिब्रिटींची हजेरी

Ira Khan Engagement: इरा आणि नूपुरच्या साखरपुड्याला दोघांच्या कुटुंबातील सदस्य हजर होते.
Ira Khan
Ira Khan Dainik Gomantak

Ira Khan Engagement: बॉलिवुड सुपरस्टार आमिर खानची लाडकी लेक इराचा साखरपुडा नुकताच पार पडला. इरा खानने तिचा बॉयफ्रेंड नूपुर शिखरेसोबत साखरपुडा केला आहे. तिचा बॉयफ्रेंड नूपुर शिखरे हा फिटनेस कोच आहे. मागील काही काळापासून इरा खान नूपुरला डेट करत होती. काही दिवसांपुर्वी नूपुरने सगळ्यांसमोर जाहीरपणे इराला प्रपोज केले होते. या दोघांचा व्हिडिओ तेव्हा चांगलाच व्हायरल झाला होता.

Kiran Rao
Kiran RaoDainik Gomantak

इरा खान आणि नूपुर शिखरेच्या साखरपुडाला दोघांच्या कुटुंबातील सदस्य हजर होते. इराचे वडील आमिर खान (Amir Khan), आजी जीनंत हुसैन, आई रीना दत्ता यांनी इराला शुभेच्छा दिल्या. तिच्या खास दिवसाला खूप स्पेशल करण्यासाठी आमिर खानने डान्स केला. इरा खानच्या (Ira Khan) या साखरपडा समारंभाला तिचे कुटुंबिय, जवळचा मित्र परिवार आणि बॉलिवुडमधील काही लोक उपस्थित होते.

Bollywood Stars
Bollywood StarsDainik Gomantak
Ira Khan
Shraddha Walker हत्याकांडावर बनणार चित्रपट, या दिग्दर्शकाने सुरु केले काम

आमिर खानचा पुतण्या इमरान खान पण या इराच्या साखरपुड्याला हजर होता. ब्लू कलरच्या ब्लेजरमध्ये इमरान खूपच हॅन्डसम दिसत होता. दंगल गर्ल फातिमा सना शेखने पण या कार्यक्रमाला हजेरी लावली. फातिमाचे आमिरच्या कुटुंबाशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे इराच्या साखरपुड्याला ती आवर्जून उपस्थित होती.

Amir Khan
Amir KhanDainik Gomantak

आमिर खानची दुसरी पत्नी किरण राव पण इराच्या साखरपुड्यात तिला शुभेच्छा द्यायला पोहचली होती. इरा आणि नूपुरच्या या साखरपुड्यामुळे आमिर खानच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. बॉलिवुडच्या (Bollywood) अनेक सेलिब्रिटींनी या न्यु कपलला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. इराने आपल्या साखरपुड्याला रेड कलरचा ड्रेस घातला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. इराच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com