Anand Mahindra : ग्लोबल स्टार म्हणत उद्योगपती आनंद महिंद्रांनी केलं राम चरणचं कौतुक

उद्योगपती आनंद महिंद्रांनी RRR चा अभिनेता 'रामचरण'चं कौतुक केलं आहे.
Anand Mahindra
Anand Mahindra Dainik Gomantak
Published on
Updated on

RRR हा चित्रपट सध्या यशाच्या शिखरावर आहे . त्यातील नाटू-नाटू या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर ऑस्कर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले आहे. आता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही राम चरण यांचे कौतुक केले आहे.

एस एस राजामौली यांचा हा चित्रपट दोन क्रांतिकारकांची गोष्ट सांगतो. या चित्रपटाचे कौतुक हॉलिवूडचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनीही केलं आहे.

साऊथ इंडस्ट्रीतले एक मोठे दिग्दर्शक म्हणुन एस एस राजामौली यांचं नाव घेतलं जातं. बाहुबली, बाहुबली 2, RRR यांसारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करणारे ठरले आहेत. राजामौली यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातल्या पात्रासाठी राम चरणचं कौतुक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केलं आहे

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर राम चरणचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले - ही व्यक्ती ग्लोबल स्टार आहे. अलीकडेच, राम चरण प्रसिद्ध गुड मॉर्निंग अमेरिका शोमध्ये पार्टिसिपेट झाला होता. शो दरम्यान राम चरणने त्याच्या चित्रपटाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

Anand Mahindra
Manoj Bajpayee :"मी 6 महिन्यांनी परत आलो तेव्हा माझ्या खोलीत 10 जण झोपले होते"! मनोज वाजपेयींनी सांगितला किस्सा...

यावर राम चरणने आनंद महिंद्राच्या या पोस्टवर आभार मानले आहेत. त्याने कमेंट करून लिहिले- खूप खूप धन्यवाद सर! भारताची वेळ आता प्रत्येक क्षेत्रात आणि फॉर्ममध्ये चमकण्याची आहे.

'RRR' चित्रपटातील 'नातू नातू' हे गाणे ऑस्कर 2023 साठी ओरिजिनल सॉन्ग कॅटेगरीमध्ये नामांकन झाले होते. गोल्डन ग्लोब आणि क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सनंतर 'नाटू नाटू'साठी हे तिसरे मोठे नामांकन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Amazon cargo plane crash
Horoscope Today September 7, 2026
Young Fisherman Marine Conservation Goa
Ram Temple Donations
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com