‘गंगापुत्र’ : एका नि:स्वार्थी माणसाची अजरामर गोष्ट

इंडियन पॅनोरामामधील नॉन फिचर विभागात या माहितीपटाची निवड करण्यात आली.
IFFI 2021: Selection of Gangaputra documentary in non-feature section of Indian Panorama
IFFI 2021: Selection of Gangaputra documentary in non-feature section of Indian PanoramaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी IFFI 2021: कुंभमेळ्यामधे हरवलेल्या माणसांची त्यांच्या परिवारासोबत भेट घडवून देणाऱ्या राजा राम तिवारी या निरालस, निरपेक्ष आणि नि:स्वार्थी माणसाचे चरित्र जनसामान्यांसमोर आले पाहिजे, या एकाच हेतूने 'गंगापुत्र'ची निर्मिती करण्यात आली असल्याचे या माहितीपटाचे दिग्दर्शक जय प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. इंडियन पॅनोरामामधील नॉन फिचर विभागात या माहितीपटाची निवड करण्यात आली.

IFFI 2021: Selection of Gangaputra documentary in non-feature section of Indian Panorama
लघुपट, माहितीपटांसाठी विशेष चॅनलची नितांत गरज..!

राजा राम तिवारी या निःस्वार्थी, सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवनावर तयार केलेला हा माहितीपट आहे. त्याच्या अद्वितीय कामाचे हे एक प्रकारे दस्तावेजीकरण आहे. हरवलेल्या लोकांना त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवून, त्यांची भेट घालून देण्याचे काम राजा राम तिवारी करतात. ते नेमके होते तरी कोण? ते हरवलेल्या, एकमेकांपासून दूरावलेल्या प्रियजनांना एकत्र कसे आणतात? अगदी साधे धोतर आणि सदरा असा वेश परिधान करणारे राजा राम तिवारी यांना ‘भूले भटकवालों का बाबा’ (हरवलेल्यांचा तारणहार) या नावाने ओळखले जाते. महाप्रचंड गर्दी असलेल्या कुंभमेळ्यामध्ये हरविणाऱ्या यात्रेकरूंना पुन्हा एकदा त्यांच्या प्रियजनांना भेटविण्यासाठी राजा राम तिवारी यांनी ‘खोया पाया’ शिबीर-तंबू तयार करतात. केवळ कुंभमेळ्यातच नाही तर त्यांनी आपले हेच जीवितकार्य आहे, असे मानून जणू ही मोहीमच हाती घेतली आहे. यासाठी 1946 मध्ये त्यांनी ‘खोया-पाय शिबिर’ या प्रतिष्ठानची स्थापना केली. या संस्थेमार्फत आत्तापर्यंत जवळपास 15 लाख महिला आणि पुरूष तसेच 21 हजारांपेक्षाही जास्त हरवलेल्या बालकांना, त्यांचे पालक शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com