Ibrahim Ali Khan: 'सरजमीन' नंतर 'या' चित्रपटात दिसणार सैफ अली खानचा मुलगा

Ibrahim Ali Khan: आता प्रेक्षकांना 'सरजमीन' या चित्रपटाविषयी उत्सुकता लागली आहे.
Ibrahim Ali Khan
Ibrahim Ali KhanDainik Gomantak

Ibrahim Ali Khan: बॉलीवूडचे कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम चर्चांचा भाग बनला आहे.

सैफ आणि अमृताचा मुलगा इब्राहिम प्रसिद्धी झोतापासून कायम दूर राहिला आहे. आता मात्र तो अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, इब्राहिमचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याला दुसरा चित्रपट मिळाला आहे. ज्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे तो 'सरजमीन' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी दाखल होणार आहे.

'सरजमीन'मध्ये दहशतवाद्याचे भूमिका तो निभावत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने काजोल आणि करण जौहर १२ वर्षांनी एकत्र येत आहेत. सध्या इब्राहिम या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याआधीच त्याच्या हाती दुसरा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.

Ibrahim Ali Khan
Jasmin Bhasin : ट्रोलिंग, अफवा आणि बलात्काराच्या धमक्या...जास्मिन भसीन पहिल्यांदाच बोलली 'डिप्रेशन'बद्दल...

'शिद्दत' आणि 'जन्नत' चित्रपटाचे दिग्दर्शक कुणाल देशमुख हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. सध्या या चित्रपटाचे नाव फिक्स केले नसले तरी तात्पुरते 'दिलेर' असे या चित्रपटाचे नाव असल्याचे म्हटले जात आहे. इब्राहिमला चित्रपटाची कहानी आवडली असून ते यावर साइन करणार असल्याची माहीती समोर आली आहे.

दरम्यान, सरजमीन हा अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे तर दिलेर हा रोमँटिक चित्रपट आहे. या चित्रपटाचे शूटिंग लंडन मध्ये केले जाईल असेदेखील म्हटले जात आहे. आता 'दिलेर' या चित्रपटाबद्दल अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केली नसली तरी लवकरच या चित्रपटासाठी इब्राहिम अली खान साइन करतील असे म्हटले जात आहे. आता प्रेक्षकांना 'सरजमीन' या चित्रपटाविषयी उत्सुकता लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com