कोविडमुळे हुनर आणि मयंक गांधीचा वाढला गोव्यात मुक्काम

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona) वाढला असून हुनर आणि मयंक गांधीने गोव्यातच (Goa) राहण्याचा निर्णय घेतला आहे
Hunar and Mayank Gandhi extend their stay in Goa
Hunar and Mayank Gandhi extend their stay in GoaInstagram/@hunarhale
Published on
Updated on

अभिनेत्री हुनर गांधी नवीन वर्षाचे स्वगत करण्यासाठी पती आणि अभिनेता मयंक गांधी यांच्यासोबत गोव्याला सुट्टीवर गेली होती. परंतु दुर्दैवाने अभिनेत्रीला अन्नातून विषबाधा झाली आणि ती आजारी असल्याने तिला घरात राहावे लागले. दरम्यान मुंबईतसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे या जोडप्याने गोव्यातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच आणखी महिनाभर गोव्यात राहण्याचा त्यांचा विचार आहे. हुनरने सांगितले की आम्ही यांच्या दोन पाळीव प्राण्यासोबत माझी आई आणि भावासोबत गोव्याला (Goa) गेलो होतो. मयंकलाही काही काम होत, पण दुर्दैवाने माझी तब्बेत बिघडत होती. त्यानंतर मुंबईत कोरोना विषाणुची झपट्याने वाढ होत आहे. आमच्या इमारतीमध्येसुद्धा कोरोना विषाणुची (Corona) अनेकांना लागण झाली आहे.

ती पुढे म्हणाली, आम्ही आमच्या जवळ असलेल्या कुत्र्यांसह मुंबईला विमानाने प्रवास करू शकत नाही. त्यामुळे आम्ही इथे गोव्यात एक जागा भाड्याने घ्यायचा आणि कुटुंबासोबत महिनाभर राहण्याचा विचार केला. आम्ही आमचे जेवण स्वत: बनवतो आणि संध्याकाळी फिरायला जातो. पण मुंबईची परिस्थिती पाहता आमच्या पाळीव प्राण्यांना बाहेर काढू शकलो नसतो".

Hunar and Mayank Gandhi extend their stay in Goa
KGF स्टार यश एकाच चित्रपटाने बनला साऊथचा सुपरस्टार

गोव्यात राहण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे कामावर परिणाम होईल का असे जेव्हा तिला विचारले तेव्हा ती म्हणाली, अभिनेतेही घरून ऑडिशन देत आहेत, त्यामुळे आता गोव्यात बसून काम शोधणे शक्य आहे. जर माझ्या आवडीचे काम असेल तर मी नक्की करेल. मला अशा आहे की परिस्तथिती लवकर सुधारले आणि आम्हाला घरी परतता येईल.

मयंक पुढे म्हणाला, "मला गोव्यात राहणे अधिक सुरक्षित वाटते आणि मुंबईची परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत आहे.आम्ही जिथे राहतो तेथील इमारतीमध्ये अनेक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने आम्हाला मुंबई सुरक्षित वाटत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com