KGF स्टार यश एकाच चित्रपटाने बनला साऊथचा सुपरस्टार

KGF स्टार यशची एंगेजमेंट 12 ऑगस्ट 2016 रोजी गोव्यात झाली होती.
KGF star Actor Yash became superstar of South with single film
KGF star Actor Yash became superstar of South with single filmDainik Gomantak
Published on
Updated on

कन्नड चित्रपट KGFचा नायक यश आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी झाला. यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. त्याचे वडील अरुण कुमार कर्नाटक परिवहन सेवेत चालक आहेत आणि आई पुष्पा गृहिणी आहेत. यशने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात मोग्गीना मनसू (Moggina Manasu 2008) मधून केली होती. यशने राजधानी, मिस्टर अँड मिसेस रामाचारी आणि किराटका सारखे चित्रपट केले असले तरी, त्याला खरी ओळख KGF चॅप्टर 1 या चित्रपटातून मिळाली आहे.

यशने अशोक कश्यप दिग्दर्शित 'नंदा गोकुळा' या टेलिव्हिजन मालिकेतून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. चित्रपटसृष्टीत त्यांना यश रॉकी या नावाने ओळखले जाते. यशचे बालपण म्हैसूर येथे गेले जेथे त्याचे शालेय शिक्षण महाजन हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर, तो बिनाका नाटक मंडळात सामील झाला. यशने 2013 सालानंतर यशाची शिडी चढली.

KGF star Actor Yash became superstar of South with single film
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' आज अ‍ॅमेझॉन प्राइम वर होणार रिलीज

2018 मध्ये रिलीज झालेला KGF हा कन्नड सिनेमातील सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट होता. या चित्रपटाने जगभरात 250 कोटींचा व्यवसाय केला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर यश हा एक प्रसिद्ध चेहरा बनला. आज यशच्या 'KGF: Chapter 2' ची सिनेरसिक वाट बघत आहे.

यश सुमारे 50 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. यशचा बंगळुरूमध्ये सुमारे चार कोटी रुपयांचा आलिशान बंगलाही आहे. यशने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'त्यांचे वडील अजूनही बस ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. यश सामाजिक कार्यासाठीही ओळखला जातो. 2017 मध्ये त्याने यश मार्ग फाउंडेशन सुरू केले. या फाऊंडेशनने कोप्पल जिल्ह्यात 4 कोटी रुपये खर्चून एक तलाव बांधला आहे, ज्यातून लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळते.

KGF star Actor Yash became superstar of South with single film
Allu Arjun 'या' चित्रपटातून करणार सिनेरसिकांचे मनोरंजन

यशने त्याची सह-अभिनेत्री राधिका पंडितशी लग्न केले. दोघेही पहिल्यांदा मिस्टर आणि मिसेस रामाचारीच्या सेटवर भेटले. दोघांची एंगेजमेंट 12 ऑगस्ट 2016 रोजी गोव्यात झाली होती. त्यानंतर 9 डिसेंबर 2016 रोजी त्यांनी बंगळुरूमध्ये लग्न केले. इतकंच नाही तर यशने आपल्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी संपूर्ण कर्नाटकाला आमंत्रित केलं होतं. आता दोघांना दोन मुले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com