Manoj Bajpayee-Irfan Pathan
Manoj Bajpayee-Irfan PathanDainik Gomantak

Manoj Bajpayee: ज्याला मी ओळखतच नाही त्याची इर्षा कशी करू; इरफानबद्दल मनोज वाजपेयी हे काय म्हणाला?

Manoj Bajpayee: मनोज वाजपेयींनी आपल्या हटके अंदाजात उत्तर दिले आहे.
Published on

Manoj Bajpayee: आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे मनोज वाजपेयी हा होय. वेगवगळ्या भूमिकांमधून तो नेहमीच आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. विशेष म्हणजे त्याने स्वत:साठी निवडलेल्या भूमिका खास असतात.

फॅमिली मॅन ही वेब सीरीज त्यापैकी एक आहे, ज्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आता एका मुलाखती दरम्यान मनोज वाजपेयींना इरफान खानबद्दल प्रश्न विचारण्यात आला. इरफान आणि मनोज एका काळचे स्पर्धक मानले जायचे. त्यामुळेच इरफानबद्दल त्याच्या मनात कधी ईर्ष्या निर्माण झाली नाही का ? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मनोज वाजपेयींनी आपल्या हटके अंदाजात उत्तर दिले आहे.

ते म्हणतात- मी इरफान बद्दल ईर्ष्या बाळगण्याचे कोणतेही मला कारण दिसत नाही. जर एखाद्या मला असुया किंवा ईर्ष्या वाटणार असेल तर त्या व्यक्तीला मी वैयक्तितरित्या ओळखत असायला हवे. मी इरफान वैयक्तिक ओळखत नव्हतो , त्यामुळे त्याच्याबद्दल मला इर्षा वाटणे शक्यच नाही.

Manoj Bajpayee-Irfan Pathan
Manoj Bajpayee: ज्याला मी ओळखतच नाही त्याची इर्षा कशी करू; इरफानबद्दल मनोज वाजपेयी हे काय म्हणाला?

आमच्या दोघांचा मित्रपरिवार वेगळा होता, आम्ही एकमेकांपासून वेगळे असल्याकारणाने एकमेकांच्या वर्तुळात येण्याचा काही प्रश्न निर्माण झाला नाही. जर मला कोणाबद्दल इर्षा वाटणार असेल तर ती शाहरुख खानबद्दल वाटायला हवी. कारण दिल्लीत असल्यापासून मी त्याला ओळखतो. त्याचा प्रवास मी जवळून पाहिला आहे.

मनोज वाजपेयी पुढे म्हणतात- हा खूप महत्वाचा प्रश्न आहे जर ते त्या पीढीतले नसरुद्दीन शहा आणि ओम पुरी असतील. दोन असे अभिनेते ज्यांनी नेहमीच एकमेकांचे स्पर्धक बनण्यापेक्षा एकमेकांच्या कामाची प्रशंसा केली.

इरफान आणि मी आम्ही दोघांनादेखील एकमेकांप्रति नेहमीच आदर वाटत आला. तो त्या समवयस्कापैकी एक होता, ज्याच्या कामातून नेहमीच शिकता आले. के के मेनन आणि विजय राझ हे दोघेही त्यापैकी एक असल्याचे मनोज वाजपेयींनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com