Honey Singh : हनी सिंहने गर्लफ्रेंडला किस करत दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा..

बॉलिवूडचा रॅपर 'हनी सिंह'ने गर्लफ्रेंड टीनाला किस करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
Honey Singh
Honey SinghDainik Gomantak

गेल्या काही दिवसांपासुन एका विचित्र आजाराने ग्रस्त असलेला हनी सिंह आता बरा झालाय असं वाटतंय कारण हनी सिंहने आपल्या गर्लफ्रेंडसोबत इंन्स्टाग्रामवर हटके शुभच्छा दिल्या आहेत. पहाटे 4 वाजता इन्स्टाग्रामवर पोस्ट करत फॅन्सना न्यू ईयर विश केलं आहे.

हनी सिंह गेल्या काही दिवसांपासुन एका आजाराने त्रस्त होता. या काळात आपण दारुच्या खुप आहारी गेलो अशी माहिती स्वत: हनी सिंहने एका मुलाखतीत दिली होती. पण आता या इंन्स्टाग्रामवरच्या पोस्टवरुन बॉलिवूडचा रॅपर बरा झालाय असं वाटतंय.अलिकडे हनी सिंह रिलशनशीपमध्ये असल्याचंही या पोस्टवरुन आपल्या लक्षात येऊ शकतं.

Honey Singh
Sana Saeed: कुछ कुछ होता है मधल्या शाहरुखच्या मुलीचा आटोपला साखरपुडा...

हनी सिंह गर्लफ्रेंड टीना थडानी हिच्याबरोबर आपला बराच वेळ घालवत असतो. सतत टीनासोबत तो सोशल मिडीयावर झळकताना दिसतो. हनी सिंहने आपल्या अतरंगी स्टाईलमध्ये टीनासह सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.टीनाला मिठीत घेत 'मेरी जान.. मेरी जान, खाएगी मीठा पान' अशी डायलॉगबाजी केली आहे.

टीनानेही हनी सिंहला किस करत न्यू ईयर सेलिब्रेशन केलं आहे. दोघांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांंचं चांगलंच मनोरंजन झालं आहे. एका युजरने 'पाजी कितने पेग' असं म्हणत हनी सिंहची मजा घेतली आहे तर दुसऱ्या एका युजरने पाजी रात्रीची उतरली असेल तर व्हिडीओ डिलीट करा असं म्हटलं आहे. थोडक्यात हनी सिंह आणि त्याची गर्लफ्रेंड टीनाने नवीन वर्षाचं जोरदार सेलिब्रेशन केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com