'पृथ्वीराज'च्या स्पेशल स्क्रिनिंगला लागणार गृहमंत्री अमित शहांची हजेरी

'पृथ्वीराज'च्या प्रेक्षकांमध्ये काही कॅबिनेट मंत्री, ज्येष्ठ राजकारणी आणि उच्चपदस्थ नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
Amit Shah will Watch Prithviraj
Amit Shah will Watch PrithvirajDainik Gomantak
Published on
Updated on

Amit Shah will Watch Prithviraj: अक्षय कुमार स्टारर 'पृथ्वीराज' चित्रपटाच्या औपचारिक रिलीजपूर्वी हाय-प्रोफाइल प्रेक्षकांसाठी तयारी करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यशराज फिल्म्स निर्मित 1 जून रोजी दिल्लीत होणाऱ्या पृथ्वीराजच्या विशेष स्क्रीनिंगला पाहणार आहेत. प्रेक्षकांमध्ये काही कॅबिनेट मंत्री, ज्येष्ठ राजकारणी आणि उच्चपदस्थ अदि यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे.

Amit Shah will Watch Prithviraj
पृथ्वीराजसाठी खर्च केले 25 कोटी ; पुन्हा तयार केले 12व्या शतकातील दिल्ली, अजमेर आणि कन्नौज

याबाबत एका सूत्राने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, "चित्रपटाची थीम भारताचे शेवटचे हिंदू शासक सम्राट पृथ्वीराज चौहान यांची कथा आहे. अमित शाह यांना या स्टोरीमध्ये खूप रस आहे, ज्यांनी नेहमीच भारतीयांना पृथ्वीराज चौहान यांचं सामर्थ्य, त्यांचं कार्य माहिती हवं असा आग्रह धरला. मुघल शासक घोरी मुहम्मदशी लढलेल्या आणि पराभूत करणाऱ्या शूरवीरांचे ऐतिहासिक मूल्य आणि पराक्रम भारतीयांना माहिती असले पाहिजे, असे शहा यांना वाटते.

“या चित्रपटाचे बजेट खूप मोठे आहे आणि हा चित्रपट 18 वर्षांच्या संशोधनानंतर करण्याता आला आहे. भारतात घडलेल्या इतिहासावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. सर्व प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाची जाहिरात केली जात आहे. आणि आता अशातच देशाचे गृहमंत्री शहा यांनाही पृथ्वीराज थेटरमध्ये जावून बघायचा आहे. त्यामुळे चित्रपटातील कलाकारांसाठी हा क्षण खूप उत्साहवर्धक ठरणार आहे.

Amit Shah will Watch Prithviraj
Karan Johar Birthday: बॉलीवुडला अनेक सुपरहिट चित्रपट देणारा दिग्दर्शक

पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित हा चित्रपट 3 जून रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये अक्षय कुमारने पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारली आहे.यामध्ये त्यांनी लढलेल्या युद्धांची गाथा चित्रित केली आहे. या चित्रपटात माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे आणि त्यात संजय दत्त आणि सोनू सूदही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com