Karan Johar Birthday: बॉलीवुडला अनेक सुपरहिट चित्रपट देणारा दिग्दर्शक

चित्रपट निर्माता करण जोहर यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांबद्दल जाणून घेउया .
Karan johar
Karan johar Instagram
Published on
Updated on

बॉलीवुडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या चित्रपटांनी सर्वांना भावूक करतो. तो दिग्दर्शकासोबत पटकथा लेखक, कॉस्च्युम डिझायनरही आहे. करणने इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांला कोणत्याही परिचयाची गरज नाही. करण जोहर (Karan Johar) आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 25 मे 1972 रोजी मुंबईत झाला. तो निर्माता यश जोहर यांचा मुलगा आहे. करणच्या वडिलांना आपल्या मुलाने अभिनेता व्हावे अशी इच्छा होती पण करणने दिग्दर्शनात आपले करिअर घडवले. करणने अभिनयाच्या (Acting) जगातही प्रवेश केला होता, पण तो काही अप्रतिम दाखवू शकला नाही, त्यानंतर दिग्दर्शनाकडे परत जाणेच त्याला बरे वाटले. आज करणच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत. (Karan Johar 50 Birthday Special Story News)

करणने त्याच्या करिअरची सुरुवात 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटातून (Movie) केली होती. या चित्रपटात त्यांने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. या चित्रपटानंतरच करणने दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला.

करण जोहरने 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या जगात पाऊल ठेवले . या चित्रपटात त्याने त्याचा खास मित्र शाहरुख खानला कास्ट केले होते. करणचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले होते.

Karan johar
ओटीटीवर अधिक मानधन घेणारे 5 कलाकार

'कुछ कुछ होता है' नंतर, करणने 'कभी खुशी, कभी गम', 'माय नेम इज खान', 'कभी अलविदा ना कहना', 'ए दिल है मुश्किल', 'लस्ट स्टोरीज', 'स्टुडंट ऑफ द इयर' आणि 'घोस्ट स्टोरीज' दिग्दर्शित केले.

करणचे हे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. आता तो 'रॉकी आणि राणी कि प्रेमकथा' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia bhatt), रणवीर सिंग (Ranveer Singh) , शबाना आझमी, जया बच्चन आणि धर्मेंद्र दिसणार आहेत. या चित्रपटाची चाहते (Fans) आतुरतेने वाट पाहत आहेत.

अभिनयात फ्लॉप ठरलेल्या करण जोहरने अनेक चित्रपटांमध्ये कॅमिओ केले आहेत. त्यानंतर त्यांनी बॉम्बे वेल्वेटमधून अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. त्याचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. तेव्हापासून त्याने अभिनयापासून दूर राहण्याचे ठरवले.आता तो चित्रपट दिग्दर्शनावर लक्ष केंद्रित करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com