Jacqueline Fernandez ला मोठा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटकेला स्थगिती

ईडी तपास करत असलेल्या 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात जॅकलीन सहआरोपी आहे.
Jacqueline Fernandez
Jacqueline Fernandez Dainik Gomantak
Published on
Updated on

सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering Case) प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस शनिवारी पटियाला कोर्टात हजर झाली. जॅकलिनला दिलासा देत न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत तिच्या अटकेला स्थगिती दिली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 नोव्हेंबरला होणार आहे. न्यायालयाने जॅकलिनच्या जामीन अर्जावर ईडीला उत्तर द्यायला सांगितले होते. त्यासाठी ईडीने वेळ मागितला आहे.

Jacqueline Fernandez
53 IFFI 2022: गोव्यातील 53 व्या इफ्फीमध्ये हे चित्रपट दाखवले जाणार, पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सुनावणीसाठी वकिलाच्या वेशात कोर्टात पोहोचली. ठग सुकेश चंद्रशेखर याच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सध्या सुरू असलेल्या ईडीच्या तपासात जॅकलीन ही सहआरोपी आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) या वर्षी 17 ऑगस्ट रोजी जॅकलिन फर्नांडिसला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी बनवून आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने देखील समन्स बजावले होते, त्यानंतर जॅकलिनच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता.

Jacqueline Fernandez
Salman Khan Dengue Positive : बॉलीवूडच्या भाईजानला डेंग्यूची लागण; सर्व शूटिंग रद्द

काय आहे प्रकरण?

200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. सुकेशवर त्याने प्रसिद्ध लोकांसह अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलीनही आरोपी आढळली होती. यामध्ये अनेक साक्षीदार आणि पुरावे समोर आले आहेत. यानंतर न्यायालयाने त्यांना समन्स बजावले. जॅकलिन मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी झाल्यानंतर तिच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com