Treat Williams Passes Away: हॉलीवूडला मोठा धक्का अभिनेते 'ट्रीट विल्यम्स' काळाच्या पडद्याआड

हॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते ट्रीट विल्यम्स यांचं अपघाती निधन झालं आहे.
Treat Williams Passes Away
Treat Williams Passes AwayDainik Gomantak
Published on
Updated on

Treat Williams Passes Away: हॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. गेली ५० वर्षे लोकांचे मनोरंजन करणारे हॉलिवूड अभिनेता ट्रीट विल्यम्स यांचे निधन झाले.

मोटारसायकल अपघातात अभिनेत्याचे निधन झाले. ट्रीट विल्यम्स यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

या अभिनेत्याने टीव्ही मालिका 'एव्हरवुड' आणि 'हेअर' या चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेने मन जिंकले. त्याच्या निधनाने जगभरातून शोक व्यक्त होत आहे.

मोटरसायकलला बसली धडक

व्हरमाँट राज्य पोलिसांच्या निवेदनानुसार, संध्याकाळी 5 वाजण्याच्या काही वेळापूर्वी, होंडा एसयूव्ही पार्किंगमधून बाहेर पडत असताना विल्यम्सच्या मोटारसायकलला धडकली.

पोलिसांनी सांगितले की, 'विलियम्स या धडकेतून वाचला नाही आणि अपघात इतका जबरदस्त होता की तो मोटरसायकलपासून दूर फेकला गेला.

त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला अल्बानी, न्यूयॉर्क येथील अल्बानी मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. 

हेल्मेटही वाचवू शकले नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रीट विल्यम्सने हेल्मेट घातले होते. या धडकेतून विल्यम्स वाचला नाही. हा अपघात इतका भयंकर होता की तो मोटारसायकलपासून दूर फेकला गेला.

त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला अल्बानी, न्यूयॉर्क येथील अल्बानी मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले ;पण तोपर्यंत उशीर झाला होता त्याला मृत घोषित करण्यात आले. 

विल्यम्स इंडिकेटर पाहिलाच नाही

अभिनेते बिली बाल्डविन यांनी हे वृत्त अधिकृत असल्याची माहिती देत एक भावनिक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला.

या धडकेत विल्यम्सचा जीव गेला, तर एसयूव्हीच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही.

पोलिसांनी सांगितले की या एसयूव्ही चालकाने वळण्याचा इशारा केला, परंतु विल्यम्सने तिकडे लक्ष दिले नाही. मात्र, अपघाताचा तपास सुरू आहे. 

Treat Williams Passes Away
Tamanna Bhatia Career : मुंबईत जन्मलेली तमन्ना साऊथची ब्यूटी क्वीन बनली...चला पाहुया तिचा हा रंजक प्रवास

हॉलीवूडमध्ये 50 वर्षे योगदान

पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून विल्यम्सने आपल्या करिअरची सुरुवात केली. 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 120 हून अधिक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले.

यामध्ये 'द ईगल हॅज लँडेड', 'प्रिन्स ऑफ द सिटी' आणि 'वन्स अपॉन अ टाइम इन अमेरिका' सारख्या शो आणि चित्रपटांचा समावेश आहे. 

1979 च्या हिट म्युझिकल हेअरच्या चित्रपट रूपांतरामध्ये हिप्पी लीडर जॉर्ज बर्जरच्या भूमिकेसाठी त्यांना गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com