Hollywood Actor John Cusack: काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सध्या खूप चर्चेत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करत आहेत. हॉलिवूड अभिनेता जॉन क्युसॅकने आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आपला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी त्याने शेतकरी आंदोलन आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा दर्शवला होता.
दरम्यान, जॉन क्युसॅकने (John Cusack) शनिवारी राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'च्या समर्थनार्थ ट्विटरवर लिहिले, "भारतीय संसद सदस्य राहुल गांधी (Rahul Gandhi) काश्मीर ते केरळ प्रवास करत आहेत." युजर्सने राहुल यांच्या समर्थनाबद्दल आभार मानले, ज्याला जॉन कुसॅकने उत्तर दिले, "होय - एकजुटता.''
तसेच, कन्याकुमारी ते काश्मीर अशी 3,500 किमी लांबीची 'भारत जोडो यात्रा' 150 दिवसांत पूर्ण होईल. जे या कालावधीत 12 राज्यांमधून जाणार आहे. केरळमधून (Kerala) जाणारा हा प्रवास 30 सप्टेंबरला कर्नाटकात पोहोचेल. जो उत्तरेकडे जाण्यापूर्वी 21 दिवस कर्नाटकात असेल. ही पदयात्रा दररोज 25 किमी अंतर कापणार आहे.
दुसरीकडे, पक्षाच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार असताना काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु आहे. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड 17 ऑक्टोबरला होणार असून 19 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी शुक्रवारी आगामी काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारीची पुष्टी केली, राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की "गांधी कुटुंबातील कोणताही सदस्य पुढील अध्यक्ष होणार नाही.''
शिवाय, पक्षाचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांनीही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असून त्यांनी सोमवारी सोनिया गांधी यांची भेट घेतली. बुधवारी त्यांनी काँग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांची भेट घेतली. दुसरीकडे, जॉन क्युसॅक हा एक प्रसिद्ध अभिनेता आहे, जो 'सेरेंडिपिटी', 'कॉन एअर', '2012' आणि 'हाय फिडेलिटी' सारख्या चित्रपटांमध्ये त्याने अफलातून भूमिका साकारल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.