Himachal News : उद्ध्वस्त संसांराच्या मदतीसाठी आमिर खान धावला... हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

प्रचंड पावसामुळे हिमाचल प्रदेशात खूप नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्त राज्यातल्या नागरिकांसाठी आता आमिर खान धावुन आला आहे.
Amir Khan Help for Himachal Pradesh Disaster
Amir Khan Help for Himachal Pradesh DisasterDainik Gomantak
Published on
Updated on

Aamir Khan's help for Himachal Pradesh : आमिर खान सध्या ग्लॅमरपासून दूर आहे. लाल सिंह चढ्ढा या चित्रपटाच्या यशानंतर त्याने काही काळ इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

आमिर सोशल मिडीयावर त्याच्या चित्रपटासाठी नसला तरी एका चांगल्या कामामुळे चर्चेत आला. हिमाचल प्रदेशातल्या लोकांना मदत केल्याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही त्याचे आभार मानले नाहीत.

हिमाचल आपत्तीग्रस्त

सध्या हिमाचल प्रदेश नैसर्गिक आपत्तींच्या विळख्यात सापडला आहे. राज्यातील अनेक नागरीक पावसाच्या प्रचंड माऱ्याने हैराण झाले आहेत.

हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी दरडी कोसळून मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहे. या संकटकाळात बॉलीवूडचा मि.फरपेक्शनिस्ट मदतीला धावून आला आहे.

आमिर मुलीच्या लग्नाच्या तयारीत

आमिर खान सध्या चित्रपटांमधून ब्रेकवर असून सार्वजनिक ठिकाणी तो क्वचितच दिसतो.  मिळालेल्या माहितीनुसार आमिर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत आहे आणि नुपूर शिखरेसोबत त्याची मुलगी इरा खानच्या भव्य लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे.

 पण यासोबतचे आमिरचे मिस्टर परफेक्शनिस्ट त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी काही आश्वासक चित्रपट निर्मात्यांशी देखील चर्चा करत आहे आणि यादरम्यान आमिरचे एक उल्लेखनिय कार्य समोर आले आहे.

उत्तम अभिनेता आणि उत्तम माणूस

हिंदी सिनेमाला एक नवा आयाम देणाऱ्या अभिनेता आमीर खानचं सध्या प्रचंड कौतुक होत आहे. अभिनेता असण्यासोबतच आमिर खान(Amir Khan) सामाजिक भान असणारा माणूस आहे.

आमिर खानने आता नैसर्गिक आपत्तींमुळे प्रभावित कुटुंबांना केलेल्या मदतीसाठी हिमाचल प्रदेशातील लोकांकडून कौतुक होत आहे.

'हिंदुस्तान टाइम्स'च्या ताज्या वृत्तानुसार, आमिर खानने हिमाचल प्रदेशातील नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना मदत केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

अलीकडे, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सांगितले की बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानने राज्य सरकारने तयार केलेल्या आपत्कालीन मदत निधी 2023 मध्ये 25 लाख रुपयांची देणगी दिली आहे. 

'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, सीएम ठाकूर सुखविंदर सिंग सुखू यांनी नुकतेच आमिर खानचे आभार मानले आहेत. त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी सुपरस्टारचे आभार मानले.

Amir Khan Help for Himachal Pradesh Disaster
Parineeti - Raghav Wedding : नेता - अभिनेत्री बनले जीवनसाथी राघव -परिणितीचा विवाह संपन्न, ग्रँड रिसेप्शन सुरू...

मुख्यमंत्र्यांनी दिला विश्वास

आपत्तीनंतर पीडित कुटुंबांना सावरण्यासाठी आमिर खानच्या मदतीमुळे मदतकार्यात मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सुखविंदर सिंह सुखू यांनी विश्वास दिला की हा निधी पूर्णपणे गरजू लोकांपर्यंत पोहोचेल. 

ते म्हणाले की, बॉलीवूड सुपरस्टारच्या या उदात्त हावभावामुळे हिमाचल प्रदेशात मान्सूनमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या जीवनात बदल घडून येईल.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com