Arijit Singh Net Worth: एका तासाच्या परफॉर्मन्ससाठी 2 कोटी, आलीशान गाड्या.... अरिजीत सिंहची एकूण संपत्ती किती? ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Arijit Singh Net Worth 2026: भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज अरिजीत सिंह आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.
Arijit Singh Net Worth
Arijit Singh Net WorthDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज अरिजीत सिंह आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या भावूक आणि सुमधुर आवाजाने जगभरातील चाहत्यांना वेड लावणाऱ्या अरिजीतने यशाची उत्तुंग शिखरे सर केली आहेत. मात्र, अफाट संपत्ती आणि प्रसिद्धी असूनही अरिजीत आजही जमिनीवर पाय ठेवून अत्यंत साध्या पद्धतीने राहतो, हीच त्याची सर्वात मोठी ओळख आहे.

४१४ कोटींची एकूण संपत्ती

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, अरिजीत सिंहची एकूण संपत्ती सुमारे ४१४ कोटी रुपये आहे. गेल्या दशकात त्याने हिंदी, बंगाली, मराठी आणि तेलुगू अशा विविध भाषांमध्ये ३०० हून अधिक गाणी गायली आहेत. त्याची ही प्रचंड कमाई केवळ गाण्यांतूनच नाही, तर रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतूनही आली आहे. साधी राहणी असली तरी अरिजीतचे मुंबईत आणि बंगालमध्ये कोट्यवधींचे बंगले आहेत.

Arijit Singh Net Worth
Goa Fishing Industry: मच्छीमारी व्यवसाय संकटात! परप्रांतीय ट्रॉलर्सचा धुडगूस सुरूच; कारवाईत हवे सातत्‍य

आलिशान मालमत्ता आणि गाड्यांचे कलेक्शन

अरिजीतकडे नवी मुंबईत ८ कोटींचा बंगला आहे, तर मुंबईच्या वर्सोवा भागात एकाच इमारतीत त्याचे ९ कोटींचे चार फ्लॅट्स आहेत. गाड्यांच्या बाबतीतही त्याला विशेष आवड आहे. त्याच्या ताफ्यात रेंज रोव्हर व्होग (Range Rover Vogue), हॅमर एच३ (Hummer H3) आणि मर्सिडीज बेंझ (Mercedes-Benz) सारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पश्चिम बंगालमधील आपल्या गावी 'जियागंज' येथे त्याचे स्वतःचे एक रेस्टॉरंट देखील आहे.

एका कॉन्सर्टसाठी घेतो 'इतके' कोटी

अरिजीत सिंहची कमाई प्रामुख्याने प्लेबॅक सिंगिंग आणि लाइव्ह कॉन्सर्ट्समधून होते. तो एका गाण्यासाठी ८ ते १० लाख रुपये मानधन घेतो. मात्र, लाइव्ह कॉन्सर्टसाठी त्याची मागणी प्रचंड आहे. एका तासाच्या परफॉर्मन्ससाठी तो सुमारे २ कोटी रुपये घेतो, तर दोन तासांच्या मोठ्या कॉन्सर्टसाठी तो तब्बल १४ कोटी रुपयांपर्यंत फी आकारतो. त्याची वार्षिक कमाई ७० कोटी रुपयांच्या घरात आहे.

Arijit Singh Net Worth
Cycling Association of Goa: सायकलिंग असोसिएशनला कोर्टाचा झटका! 66 जणांचे सदस्यत्व वैध; 'मतदार वाढतील' हे कारण ठरले आक्षेपार्ह

यश असूनही साधेपणाचा आदर्श

इतक्या मोठ्या साम्राज्याचा मालक असूनही अरिजीत सिंह अनेकदा सार्वजनिक ठिकाणी साध्या कपड्यांत, चप्पल घालून वावरताना दिसतो. अनेकदा तो आपल्या मुलाला शाळेत सोडायला स्वतःच्या स्कूटीवर किंवा सार्वजनिक वाहतुकीने जाताना दिसला आहे. ग्लॅमरच्या जगात वावरतानाही आपला साधेपणा टिकवून ठेवणारा अरिजीत हा खऱ्या अर्थाने एक 'डाऊन टू अर्थ' कलाकार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com