Abhilipsa Panda
Abhilipsa PandaDainik Gomantak

'हर हर शंभू' Abhilipsa Panda चे नवरात्री निमित्ताने नवे भक्तीगीत रिलीज, पाहा व्हिडिओ

अभिलिप्सा पुन्हा एकदा एका भक्तिगीतातून तिच्या आवाजाची जादू पसरवत आहे.
Published on

'हर हर शंभू' गाण्यामुळे चर्चेत आलेली अभिलिप्सा पांडा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे अभिलिप्सा पांडाचे नवे गाणे रिलीज झाले आहे. यापूर्वी अभिलिप्सा महादेवाचे भक्तिगीत गायले आहे. हे गाण सोशल मिडीयावर (Social Media) प्रचंड लोकप्रिय झाले आहे. त्याचबरोबर ती आता दुर्गा माँची पूजा करताना दिसत आहे. अभिलिप्साने नवरात्रीच्या मुहूर्तावर नवीन गाणे रिलीज केले आहे. अभिलिप्सा पुन्हा एकदा एका भक्तिगीतातून तिच्या आवाजाची जादू पसरवत आहे.

शनिवारी अभिलिप्साने 'नव दुर्गे नमो नम:' या गाण्याच्या रिलीजची घोषणा करणारे पोस्टर सोशल मिडीयावर शेअर केले. अभिलिप्साने (Abhilipsa Panda) शेअर केलेल्या पोस्टरमध्ये माँ दुर्गाचा फोटो दिसत आहे. माँ दुर्गेची पूजा करताना अभिलीपला पोस्टरमध्ये हात जोडून उभी दिसत आहे.

Abhilipsa Panda
Hollywood Actor John Cusack: 'भारत जोडो यात्रे'ला हॉलिवूड अभिनेत्याने दिला पाठिंबा

अभिलिप्साचा 'नव दुर्गे नमो नमः' हे भक्तीगीत 25 सप्टेंबरला रिलीज झाले आहे. व्हिडिओमध्ये (Video) अभिलिप्सा लाल साडी नेसून 'नव दुर्गे नमो नमः' गाताना दिसत आहे. अभिलिप्साचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. ती गाणे इतक्या अप्रतिम पद्धतीने गात आहे की ऐकणारा मंत्रमुग्ध होतो. गाण्यात (Song)वेगळीच अनुभूती आहे. 'नव दुर्गा नमो नमः' ऐकून आईच्या भक्तीत तल्लीन झाल्यासारखे वाटते. या गाण्याचे बोल संदीप कपूर यांनी लिहिले आहेत. अभिलिप्सा पांडाने 'नव दुर्गे नमो नमः' हे गाणे इतक्या दमदार पद्धतीने गायले आहे की ते ऐकल्यानंतर तिचे चाहते आनंदित होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com