Juhi Chawla Birthday Special: जुही चावलाने नाकारलेले सुपरहिट चित्रपट कोणती, वाचा एका क्लिकवर

Juhi Chawla: वाढदिवसानिमित्त जाणून घेउया जुही चावलाच्या खास गोष्टी कोणत्या आहेत.
Juhi Chawla Birthday Special
Juhi Chawla Birthday SpecialDainik Gomantak

Juhi Chawla Birthday News:  बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जुही चावला (Juhi Chawla) ओळखली जाते. तिने अनेक सपरहिट चित्रपट दिले आहे. 1988 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'कयामत से कयामत तक' या चित्रपटामधील जुहीची भुमिका सर्वांना आवडली होती. तसेच ‘डर’, ‘दीवाना मस्ताना’, ‘इश्क’, ‘हम हैं राही प्यार’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज जुही 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग जाणून घेउया तिच्याबद्दल खास गोष्टी.  

  • जुहीने नाकारले ब्लॉकबस्टर सिनेमे

जुही चावलाने बॉलिवूडमध्ये स्वत:चं नाव कमवल्यानंतर अनेक चित्रपट नाकारले आहेत. जुहीने नाकारलेले हे चित्रपट पुढे जाऊन ब्लॉकबस्टर ठरले आहेत. यात 'बीबी नं 1', 'राजा हिन्दुस्तानी', 'दिल तो पागल है', 'राजा बाबू' या चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट त्यावेळी जुहीने नाकारल्याने तिचे चाहते नाराज झाले होते.

जुही चावला 1984 ची मिस इंडिया (Miss India) विजेती आहे. मिस इंडियाची विजेती झाल्यानंतर जुही चावलाच्या फिल्मी प्रवासाला सुरुवात झाली. ‘सल्तनत’ या चित्रपटाच्या माध्यमातून जुहीने सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यानंतर ‘कयामत से कयामत तक’ हा जुहीचा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटामुळे जुहीला लोकप्रियता मिळाली.

Juhi Chawla Birthday Special
IFFI: हृदयस्पर्शी 'धाबरी कुरुवी'; फक्त स्थानिक कलाकार असलेला भारतीय इतिहासातील पहिला चित्रपट
  • सलमानला करायचं होतं जुहीसोबत लग्न

'दिवाना मस्ताना' या चित्रपटात जुही चावला आणि सलमान खान मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात दोघांचं लग्न झाल्याचे दाखवण्यात आले होते. पण खऱ्या आयुष्यात त्यांची लग्न करण्याची इच्छा अपुरी राहिली आहे. सलमानला जुहीसोबत लग्न करण्याची इच्छा होती. त्यानंतर जुही 1997 साली उद्योगपती जय मेहतासोबत लग्नबंधनात अडकली. राकेश रोशनने जुही आणि जयची भेट घडवून आणली होती. 80-90 च्या दशकात सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्रींच्या यादीत जुहीचे नाव असे. जुहीला दोन फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com