IFFI: हृदयस्पर्शी 'धाबरी कुरुवी'; फक्त स्थानिक कलाकार असलेला भारतीय इतिहासातील पहिला चित्रपट

राखेतून भरारी घेणाऱ्या आदिवासी समुदायातील फिनिक्सच्या उदयाची कहाणी सांगणारा प्रेरणादायी 'धाबरी कुरुवी' चित्रपट
IFFI Goa
IFFI Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

IFFI Goa : राखेतून भरारी घेणाऱ्या, निर्भय...केरळमधील आदिवासी समाजातील मुलींच्या उत्तुंग भरारीची कथा सांगणारा हृदयस्पर्शी 'धाबरी कुरुवी' (Dhabari Quruvi) चित्रपट, फक्त स्थानिक कलाकार असलेला भारतीय इतिहासातील हा पहिला चित्रपट आहे. प्रेरणेणं ओतप्रोत भरलेला सिनेमा अनुभवायचा असेल तर, गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (53rd edition of the International Film Festival of India) 'धाबरी कुरुवी' हा सिनेमा पाहायलाच हावा.

IFFI Goa
53rd Iffi Goa: मधुर भांडारकर यांच्या 'इंडिया लॉकडाऊन'चा इफ्फीत वर्ल्ड प्रीमियर 

'धाबरी कुरुवी' चित्रपटात फक्त आदिवासी समुदायातील लोकांनीच कलाकार म्हणून काम केले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अशा पद्धतीने चित्रित केलेला हा पहिलाच चित्रपट आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते प्रियनंदन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपट पूर्णपणे इरुला या आदिवासी भाषेत चित्रित करण्यात आला आहे. गोव्यात 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा विभागात या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.

इरुला भाषेत धाबरी कुरुवी म्हणजे 'बाप माहिती नसलेली चिमणी'. हा एक पौराणिक पक्षी असून, आदिवासी लोककलेचा भाग आहे. तो शांतपणे अन्यायाच्या सहन करणाऱ्या, अन्यायाच्या बेड्या तोडण्यासाठी तळमळणाऱ्या लोकांच्या कहाणी गोळा करत असतो. या चित्रपटात या आदिवासी लोकांच्या व्यथा आणि संघर्ष अधोरेखित करण्यात आले आहेत. आदिवासी लोकांच्या खऱ्या अस्मितेला आणि संस्कृतीला न्याय देऊ न शकलेल्या सिनेमा विश्वासाठी, धाबरी कुरुवी हा चित्रपट आशेचा किरण आहे.

IFFI Goa
Bhumi Pednekar भूमी पुढं हॉलिवूड फिकं पडलंय

आदिवासी वस्तीवरील कलाकारांची निवड

या चित्रपटात दक्षिण भारतातील केरळ राज्यातील इरुला, मुदुका, कुरुंबा आणि वडुका या आदिवासी समुदायातील कलाकारांची निवड करण्यात आली आहे. अट्टपडी येथे झालेल्या अभिनय कार्यशाळेतून कलाकारांची निवड करण्यात आली, या कार्यशाळेत 150 स्थानिक सहभागी झाले होते. चित्रपटात मीनाक्षी, श्यामिनी, अनुप्रसोभिनी आणि मुरुकी यांच्या मुख्य भूमिका आहेत. केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीही या चित्रपटाची निवड झाली आहे. इफ्फीत 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 पासून पणजी येथील आयनॉक्स ऑडिटोरियम 2 मध्ये हा चित्रपट पाहता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com