HBD Abhishek Bachchan: अभिषेक बच्चनने कसे केले ऐश्वर्या रायला प्रपोज? वाचा हटके लव्हस्टोरी

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता अभिषेक बच्चन आज त्याचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे.
HBD Abhishek Bachchan
HBD Abhishek BachchanDainik Gomantak
Published on
Updated on

Abhishek Bachchan Love Story: बॉलिवूडचे शहनसाह अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनचा आज वाढदिवस आहे. अभिषेक त्याच्या सिनेसृष्टीतील करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला आज इतकी वर्षे झाली असली तरी त्यांची लव्हस्टोरी जाणून घेण्याची प्रत्येकालाच खुप उत्सुकता असते. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेउया त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल अधिक माहिती.

  • अभिषेक आणि ऐश्वर्याची पहिली भेट कधी झाली?

अभिषेक आणि ऐश्वर्या यांची पहिली भेट 1999 साली 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटाच्या फोटो शूटदरम्यान झाली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्याची ओळख झाली. ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटात अभिषेक आणि ऐश्वर्याने प्रथमच एकत्र काम केले आहे.

त्यानंतर ते 2003 साली 'कुछ ना कहो' या चित्रपटात पुन्हा एकत्र रुपेरी पडद्यावर दिसले. 2005 साली अभिषेक आणि ऐश्वर्याच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अभिषेक आणि ऐश्वर्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

HBD Abhishek Bachchan
Thalpathy Vijay : थलपती विजयच्या आगामी चित्रपटाच्या टायटलचे अनावरण
  • अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज कसं केलं?

अभिषेकने फिल्मी स्टाइलने ऐश्वर्याला प्रपोज केले आहे. 2007 साली एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिषेक आणि ऐश्वर्या न्यूयॉर्कला गेले होते. त्यावेळी अभिषेकने ऐश्वर्याला कसे प्रपोज करायचे याचा खूप विचार केला.

अखेर न्यूयॉर्कमधील हॉटेलच्या बाल्कनीत त्याने फिल्मी स्टाइलने ऐश्वर्याला प्रपोज केले. ऐश्वर्याला देखील अभिषेक आवडत असल्याने तिने लगेचच होकार दिला. अखेर 20 एप्रिल 2007 साली अभिषेक आणि ऐश्वर्या लग्नबंधनात अडकले.

  • अभिषेकेचा बॉलिवूडमधील प्रवास

अभिषेकने 2000 साली 'रिफ्यूजी' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्याने 'धूम', 'सरकार', 'कभी अलविदा ना कहना', 'गुरु', 'बंटी और बबली', 'दस', 'ब्लफमास्टर', 'धूम 2', 'दोस्ताना', 'पा', 'बोल बच्चन', 'धूम 3', 'हॅपी न्यू ईयर' आणि 'हाऊसफुल्ल 3' सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे.

त्याचे काही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाले आहेत. यात 'ब्रीद: इनटू द शैडोज', 'लूडो' आणि 'दसवी' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. अभिषेकला आजवर तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com