Hadh Kar Di Aapne Remake: या चित्रपटासाठी राणी मुखर्जी नाही तर गोविंदासोबत ही अभिनेत्री करणार होती काम...

हद कर दी आपने या 90 तल्या चित्रपटात राणी मुखर्जी नाही तर महिमा चौधरी काम करणार होती.
Hadh Kar Di Aapne
Hadh Kar Di AapneDainik Gomantak
Published on
Updated on

Rani Mukherji in Hadh Kar Di Aapne: 90 च्या दशकात अभिनेता गोविंदाचा करिश्मा चांगलाच चालला होता. आपल्या विनोदी आणि तितक्याच सहज अभिनयाने गोविंदाने प्रेक्षकांना वेड लावले होते. गोविंदासोबत अभिनेत्री राणी मुखर्जीचा एक चित्रपट चांगलाच चालला होता.

गोविंदा आणि राणी मुखर्जी यांच्या क्लासिक रोमँटिक रोम-कॉम 'हद कर दी आपने' ने नुकतीच त्याच्या रिलीजला 23 वर्षे पूर्ण केली आहेत.

गोविंदाचा राज आणि राणीची अंजलीची ऑन-स्क्रीन जोडी सर्वांनाच आवडली होती आणि त्यांची हेट-लव्ह केमिस्ट्री आजही प्रत्येकाच्या हृदयात आणि मनात कोरलेली आहे. मात्र, या चित्रपटातील अंजली खन्नाच्या भूमिकेसाठी राणी ही पहिली पसंती नव्हती हे अनेकांना माहीत नसेल.

दिग्दर्शक मनोज अग्रवाल यांनी अलीकडेच हद कर दी आपने या चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल खुलासा केला. गोविंदा आणि महिमा चौधरी यांना चित्रपटात मुख्य भूमीकेसाठी कास्ट करायचे होते, असे तो म्हणाला. 

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत,त्यांनी सांगितले की सुरुवातीला गोविंदा आणि महिमा होते हेच या चित्रपटाचे मुख्य कलाकार होते, परंतु नंतर तारखांच्या कमतरतेमुळे महिमा चित्रपटाचा भाग होऊ शकली नाही. मनोज अग्रवाल म्हणाले की, महिमा अजूनही त्यांची जिवलग मैत्रीण आहे आणि तो नेहमीच तिचे कौतुक करतो.

मनोजला जेव्हा विचारण्यात आले की तो नजीकच्या काळात हद कर दी आपनेचा रिमेक करण्याचा विचार करत आहे, तेव्हा त्याने सांगितले की त्याने स्क्रिप्ट आधीच तयार केली आहे.

तो म्हणाला की त्याला ट्रोल होण्याची भीती वाटत नाही कारण रिमेक सीन-दर-सीन कॉपी होणार नाही. चित्रपटातील पात्रेही थोडी वेगळी असतील पण सार तेच राहील, असे ते म्हणाले.

Hadh Kar Di Aapne
Swara Bhasker Eid Celebration: स्वरा भास्करची पहिलीच ईद...कुटूंबासोबतचे फोटो केले शेअर

मनोज अग्रवाल पुढे म्हणाले, "इतर दिग्दर्शक गोविंदासोबत फक्त आयटम साँग करायचे, जे मला टाळायचे होते. मला आयटम गाणी समजत नाहीत आणि मला माझी छाप सोडायची होती.

मी याआधीही आयटम टाईप गाण्यांचा प्रयत्न केला. मी अयशस्वी झालो. कथेच्या प्रवाहाला अनुरूप किंवा चित्रपटाला साजेसे गाणे मी घालण्याला मी नेहमी प्राधान्य देतो."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com