ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन झाले. पीटीआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वयाचा 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचे मुंबईच्या रुग्णालयात निधन झाले. संगीताव्यतिरिक्त, बप्पी लहिरी हे वजनदार सोन्याच्या चेन आणि दागिने घालण्यासाठी देखील ओळखले जातात.
गेल्या वर्षी या ज्येष्ठ गायकाला कोरोनाव्हायरसची लागन झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बप्पी दा यांनी कोरोनावर लवकरच मात केली होती आणि ते घरी गेले होते. याशिवाय, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बप्पी दा यांनी आपला आवाज गमावल्याच्या बातम्याही चर्चेत आल्या होत्या. मात्र, गायकाने एक निवेदन जारी करून या बातम्यांना खोटे असल्याचे सांगितले होते.
बॉलिवूडचा डिस्को किंग म्हटल्या जाणाऱ्या बप्पी दाचे खरे नाव आलोकेश लहिरी आहे. 2014 मध्ये बप्पी दा यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. निवडणूक आयोगासमोर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी सोन्या-चांदीची माहिती दिली होती. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की बप्पी दा जाड सोनसाखळ्या घालत असले तरी त्यांच्या पत्नी चित्रानीकडे त्यांच्यापेक्षा जास्त दागिने आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.