Goa IFFI 53: आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'दृश्यम 2' चे होणार स्पेशल स्क्रीनिंग, सिंघम लावणार हजेरी

Drishyam 2: गोव्यात होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग होणार आहे.
Drishyam 2 Trailer
Drishyam 2 TrailerDainik Gomantak

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणचा आगामी चित्रपट 'दृश्यम 2' उद्या रिलीज होणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल अशी आशा निर्मात्यांना आहे. अजय देवगणचा 'दृश्यम 2' भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) स्पेशल स्क्रीनिंग होणार आहे. भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) गुरुवारी अजय देवगणचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

हा चित्रपट (Movie) 21 नोव्हेंबर रोजी गोव्यात रिलीज होणार आहे. जिथे त्याचे स्पेशल स्क्रिनींग होणार आहे. यासोबतच अजय देवगण (Ajay Devgan) स्पेशल स्क्रिनिंगसाठी गोव्यात उपस्थित राहणार आहे. NFDC ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अजय म्हणतो, "नमस्कार, मला माहीत आहे की तुम्ही सर्व 'दृश्यम 2' (Drishyam 2) ची आतुरतेने वाट पाहत आहात आणि मी तुम्हाला लवकरच भेटेन. या वर्षातील सर्वात प्रतिक्षित चित्रपट 'दृश्यम' 2'चा प्रीमियर होत आहे. 53 व्या IFFI मध्ये एकत्र पाहूया, गोव्यात भेटूया ."

Drishyam 2 Trailer
India Lockdown Trailer Out Now: 'इंडिया लॉकडाऊन' चा ट्रेलर आउट, 'या' दिवशी होणार रिलीज

गोव्याशी (Goa) असलेल्या चित्रपटाच्या 'सत्संग' आणि पणजीमध्ये शूट केलेल्या पावभाजीमुळे अनेक मीम्स आणि व्हायरल विनोदांना प्रेरणा मिळाली आहे. 'दृश्यम 2' हा 2015 मध्ये आलेल्या चित्रपटाचा सीक्वल आहे. जो त्याच नावाचा हिट ठरला होता. हा मल्याळम सुपरहिट चित्रपटाचा रिमेक होता. ज्यात सुपरस्टार मोहनलाल मुख्य भूमिकेत होते. 2015 च्या 'दृश्यम' चे दिग्दर्शन दिवंगत निशिकांत कामत यांनी केले होते. ज्यांचे 2020 मध्ये सिरोसिसमुळे निधन झाले. 'दृश्यम 2'चे दिग्दर्शन निर्माता कुमार मंगत पाठक यांचा मुलगा अभिषेक पाठक यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com