India Lockdown Trailer Out Now: 'इंडिया लॉकडाऊन' चा ट्रेलर आउट, 'या' दिवशी होणार रिलीज

लॉकडाऊन दरम्यान अस्थाव्यस्थ झालेलं जनजीवन आणि त्यामुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती 'इंडिया लॉकडाउन' या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
India Lockdown Trailer Out Now:
India Lockdown Trailer Out Now:Dainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्या 'इंडिया लॉकडाउन' (India Lockdown) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान उद्भवलेली भीषण परिस्थिती यासंदर्भातील वास्तव या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

कोरोना विषाणूच्या हाहाकारामुळे  2020 मध्ये देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीला 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. पण नंतर हा लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आला.

या दरम्यान अनेक लोकांना समस्यांचा सामना करावा लागला. लॉकडाऊनच्या काळात वाहतूक व्यवस्था बंद असल्याने काही कामगारांनी तर आपल्या गावी पायी जाण्याचा निर्णय घेतला. याच लोकांची कथा या चित्रपटात दाखण्यात येणार आहे. झी-5 च्या युट्यूब चॅनलवर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

'इंडिया लॉकडाउन' हा चित्रपट झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे.  या चित्रपटात प्रतीक बब्बर, श्वेता बासु प्रसाद, अहाना कुमार, प्रकाश बेलावेदी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. 2 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

India Lockdown Trailer Out Now:
Shehnaaz Gill Dance Video: शहनाज गिल चा 'झिंगाट' पाहिलात का ?

या वर्षातील मधुर भांडारकर यांचा ओटीटीवर रिलीज होणारा हा दुसरा चित्रपट असणार आहे. याआधी त्यांचा 'बबली बाउंसर' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. या चित्रपटात (Movie) तमन्ना भाटियानं मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये Disney+Hotstar वर रिलीज झाला होता. आता 'इंडिया लॉकडाउन'  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com