Genelia Pregnancy News
Genelia Pregnancy NewsDainik Gomantak

Genelia Pregnancy News : "लोकसंख्येचा विचार नाही केला" जेनेलियाच्या प्रेग्नन्सीवर युजर्सच्या प्रतिक्रिया

अभिनेत्री जेनेलियाच्या प्रेग्नन्सीवर सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरू असुन आता यावर युजर्सच्या प्रतिक्रिया येत आहेत.
Published on

रितेश देशमुख आणि जेनेलिया हे इंडस्ट्रीतील एक क्यूट कपल म्हणून ओळखले जाते. कुठल्याही अवॉर्ड शोमध्ये किंवा पार्टीमध्ये जाताना दोघांवर सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात.

सध्या सोशल मिडीयावर जेनेलियाच्या प्रेग्नंसीची जोरदार चर्चा सुरू आहे. जेनेलियाच्या प्रेग्नन्सीनंतर काही यूजर्स तिला सल्लेही देत आहेत.

रितेश- जेनेलियाचं लग्न

जेनेलिया आणि रितेशच्या रिलेशनशीपच्या अफवा दोघांच्या पहिल्या चित्रपटापासूनच होत्या.

2 फेब्रुवारी 2012 रोजी जेनेलिया आणि रितेशचे लग्न झाले. 2014 मध्ये त्यांचा मुलगा रायनचे प्रथमच पालक बनले. 

2016 मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर रितेश आणि जेनेलिया दोन मुलांचे आई-बाप बनले . पण आता जेनेलियाच्या नव्या फोटोंमुळे ती पुन्हा प्रेग्नंट असल्याचं समोर येत आहे. 

रितेश - जेनेलियाचा व्हायरल व्हिडीओ

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमातील जेनेलिया डिसूझा आणि तिचा पती रितेश देशमुख यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

 व्हिडिओमध्ये, हे सुंदर जोडपे मुंबईतील एका फॅशन स्टोअरच्या लॉन्चमध्ये हातात हात घालून येताना दिसत आहे. 

रितेश जेनेलियाचा लूक

कार्यक्रमादरम्यान, रितेश पांढर्‍या शर्टमध्ये देखणा दिसत होता, त जेनेलियाने जांभळ्या रंगाचा मिनी ड्रेस घातला होता दोघेही त्या कपड्यात खुलून दिसत होते.

जेनेलियाचा लूक

जिनिलियाने हूप इअररिंग्स, ड्यू मेकअप, स्टेटमेंट गोल्डन हिल्स आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसली. तिचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताच लोकांचे लक्ष जिनिलियाकडे गेले आणि तिच्या प्रेग्नंसीच्या अफवा यायला सुरूवात झाली. 

इव्हेंटच्या फोटोंवर प्रतिक्रिया देताना, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज लावला.

Genelia Pregnancy News
Genelia Pregnancy NewsDainik Gomantak
Genelia Pregnancy News
Shahrukh's Jawan : 'जवान'मधला हॉस्पीटलच्या दुरावस्थेचा तो सीन उत्तरप्रदेशातल्या त्या घटनेवर आधारित? कोण आहेत डॉ. कफिल खान?
Genelia Pregnancy News
Genelia Pregnancy NewsDainik Gomantak

युजर्सच्या कमेंट

एका यूजरने लिहिले की, 'ती प्रेग्नंट आहे का?' एका इंटरनेट युजरने लिहिले, 'तू पुन्हा प्रेग्नंट आहेस का?' तर एकाने लिहिले की, 'ती गरोदर असेल तर भारतातील लोकसंख्येच्या मनातही आले नाही.' एका यूजरने लिहिले की, 'मला वाटते की ती नक्कीच प्रेग्नंट आहे.', .'

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com