दिग्दर्शक 'संजय लीला भन्साळी' हा बॉलिवूडचा असा दिग्दर्शक याच्या चित्रपटाच्या चर्चा या रिलीज होण्याआधीच खुप मोठ्या प्रमाणात होत असतात. बाजीराव - मस्तानी, पद्मावती ही काही उदाहरणं सांगता येतील. गतवर्षात त्याचा आणखी एक सुपरहिट चित्रपट आला होता.
या चित्रपटाने जोरदार यश तर मिळवलेच पण त्याचबरोबर चित्रपटाच्या प्रमुख अभिनेत्रीला एक वेगळी ओळख मिळवुन दिली. या चित्रपटाचे भारतात तर कौैतुक झालेच ;पण आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही चित्रपटाला नावाजलं जात आहे. आणि हा चित्रपट म्हणजे आलिया भट्टच्या संयत अभिनयाने नटलेला 'गंगुबाई काठियावाडी'.
मिळालेल्या माहितीनुसार आता ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट नॅशनल अर्काइव्हच्या रॉबिन बेकर यांनी या चित्रपटावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. गेल्यार्षी या चित्रपटात भारतातच नव्हे तर परदेशातल्या प्रेक्षकांचीही मनं जिंकली होती. त्यातच आता बेकर यांनी केलेल्या कौतुकामुळे संजय लीला भन्साळी खुष झाले असतील हे नक्की.
ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट नॅशनल आर्काइव्हचे मुख्य क्युरेटर रॉबिन बेकर यांनी सोशल मीडियावर 'गंगूबाई काठियावाडी'चे कौतुक करताना म्हटले आहे की "मला वाटतं बाफ्टा आणि अकादमी पुरस्कारांनाही हा पहावा"
पुढे बेकर म्हणतात मी जर बाफ्टा किंवा अकादमीचा सदस्य असतो तर 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातल्या अभिनयासाठी मी यावर्षी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मत दिलं असतं . या चित्रपटात एक प्रॉस्टि्यूट पासून अंडरवर्ल्ड वेश्यालय असा तिचा प्रवास आहे. बेकर यांना संजय लीला भन्साळी यांचं दिग्दर्शन मनापासुन आवडलं आहे हे मात्र नक्की.
संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपट केवळ एक चांगली कलाकृती नसतात तर त्यातुन चांगले कलाकारही घडतात. अभिनेता किंवा अभिनेत्रींना एक चांगला दिग्दर्शक किती चांगल्या पद्धतीने समोर आणु शकतो याचं उदाहरण म्हणजे संजय लीला भन्साळी. आलीया भट्टने या चित्रपटासाठी केलेली तयारी आणि त्यातून समोर आलेली देखणी कलाकृती नक्कीच कौतुक करण्यायोग्यच आहे.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर जोरदार कमाई केली होतीच पण एक सुंदर कलाकृती म्हणुनसुद्धा प्रेक्षकांनी स्वीकारलं
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.