Sushmita Sen Upcoming Show Taali: अशी झाली गणेश नंदनची गौरी सावंत; सुष्मिताच्या 'ताली'ची इनसाइड स्टोरी

Sushmita Sen: वडीलांनी जिवंत असताना अत्यंसंस्कार केले होते.
Sushmita Sen
Sushmita SenDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

बॉलीवूडची प्रसिद्ध आणि लाडकी अभिनेत्री सुश्मिता सेन आपल्या नवनवीन प्रोजेक्टमुळे सातत्याने चर्चेत असते. तिच्या दमदार अभिनयामुळे आणि उत्तम भूमिकांमुळे तिला चाहत्यांचे भरभरुन प्रेम मिळते. या वर्षी सुश्मिता सेन एक नाही तर दोन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्या ३ लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलिज होणार असून तिची बहुचर्चित वेबसीरीज ताली आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. 30 जूनला या बेवसीरीजचे मोशन पोस्टर रिलिज झाले असून चाहत्यांना ते प्रचंड आवडल्याचे सोशल मिडियावर दिसून आले होते.

सुष्मिता सेन आणि गौरी सावंत यांनी आपापल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ताली चे मोशन पोस्टर रिलिज केले आहे. हे पोस्टर शेअर करत 'लाख गिरा दे बिजली मुझपे, मैं तो सतरंग बनूं। मैं ताली बजाती नहीं, बजवाती हूं' असे कॅप्शनदेखील दिले आहे.

Sushmita Sen
Priyamani On Intimate Scenes: मी नवऱ्याला काय उत्तर देऊ? इंटिमेट सीनवर दिग्गज अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

कोण आहे गौरी सावंत?

ताली ही वेबसीरीज गौरी सावंत या तृतीयपंथी असणाऱ्या सोशल वर्करच्या आयुष्यावर आधारित आहे. एक तृथीयपंथी म्हणून गौरी यांनी आपल्या जीवनात अनेक संकटाचा सामना केला आहे. मात्र आज त्या तृथीतपंथीयांच्या विकासासाठी काम करत आहेत.

गौरी सावंत यांनी एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील अनेक पैलूंचा उलघडा केला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, माझ्या वडीलांनी मी जिवंत असताना माझे अत्यंसंस्कार केले होते. मराठमोळ्या कुटुंबात जन्मलेल्या गौरी सावंत यांचे नाव खरे नाव गणेश नंदन असे होते.

अवघ्या सातव्या वर्षी आईचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा सांभाळ आजीने केला. थोडे मोठे झाल्यानंतर जेव्हा त्यांना त्यांच्या सेक्शुएलिटीबद्दल समजले तेव्हा वडीलांना सांगण्याची हिम्मत झाली नाही आणि जेव्हा समजले तेव्हा वडिलांनी त्यांचा स्विकार केला नाही. त्यानंतर त्यांनी घर सोडले. घर सोडल्यानंतर वेजिनोप्लास्टी करुन गणेश नंदन ही ओळख कायमसाठी बाजूला करत गौरी सावंत बनल्याचे गौरीने सांगितले आहे.

कधी होणार रिलिज?

'ताली' ही वेबसीरीज जिओ सिनेमावर रीलीज होणार असून त्याच्या तारखेवर निर्मात्यांनी शिक्कामोर्तब अद्याप केला नाही. 'रवी जाधव' दिग्दर्शित ताली ची चाहते मोठ्या उत्साहाने वाट पाहत आहेत. सुष्मिता सेनवर सीरीजच्या प्रदर्शित होण्याआधीच कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिचे फॅन्स तिला शेरनी म्हणत तिचे कौतुक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Kashti Kale Drain Pollution
Goa Political Meetings During Ganesh Chaturthi
Goa Ganesh Immersion Safety 2026
Ganesh Chaturthi Spiritual Significance Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com