Gadar 2 vs OMG 2 Advance Booking : अक्षय कुमारचा जोर चालेना? ॲडव्हान्स बुकींगमध्ये सनीच्या गदरने मारली बाजी...

ॲडव्हान्स बुकींगच्या बाबतीत अक्षयचा ओएमजी 2चा सनीच्या गदर 2 समोर अपयशी ठरला आहे.
Gadar 2 vs OMG 2 Advance Booking
Gadar 2 vs OMG 2 Advance BookingDainik Gomantak
Published on
Updated on

Gada 2 vs OMG 2 Advance Booking : बॉक्स ऑफिसवर 11 ऑगस्ट रोजी जोरदार टक्कर होणार आहे. अक्षय कुमारचा ओह माय गॉड २ आणि सनी देओलचा गदर २ चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. दोघांची ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे ज्यामध्ये OMG 2 ला सनी देओलच्या गदर 2 समोर टिकणं मुश्किल झालं आहे.

स्वातंत्र्यदिन असणार स्पेशल

हा स्वातंत्र्यदिन चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. या आठवड्यात 11 ऑगस्टला सनी देओलचा 'गदर 2' आणि अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड-2' मोठ्या पडद्यावर भिडणार आहेत. दोन्ही चित्रपटांचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे.

ओ माय गॉड 2 ची निराशा

सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग 1 ऑगस्टपासूनच सुरू झाले होते, तर अक्षय कुमारचा चित्रपट 'ओह माय गॉड-2' एका दिवसानंतर झाले. अक्षय आणि सनी देओलच्या चित्रपटांच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये अवघ्या 24 तासांचे अंतर होते.

सनी देओलच्या 'गदर 2' ची ॲडव्हान्स बुकिंग दिवसेंदिवस वाढत असताना, 'ओह माय गॉड 2' ही केवळ निराशाच असल्याचे दिसते. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये दोन्ही चित्रपटांनी आतापर्यंत किती कमाई केली आहे ते चला जाणून घेऊया.

गदर जोमात

'गदर 2' तीन दिवसांनी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. तारा-सकीना जोडी 22 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. गदर २ चे पहिले पोस्टर आल्यापासून लोकांच्या मनात या चित्रपटाची उत्सुकता वाढली होती.

या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू होऊन सहा दिवस उलटले आहेत आणि Koimoi.com वर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत केवळ अॅडव्हान्स बुकिंगद्वारेच त्याने सुमारे 4 कोटींचा व्यवसाय केला आहे. कालपर्यंत 'गदर 2'चे कलेक्शन 3.30 कोटींच्या जवळ पोहोचले होते.

ॲडव्हान्स बुकींगमध्येच होणार मोठी कमाई

केवळ ॲडव्हान्स बुकींगमध्ये चित्रपटाची कमाई लक्षात घेता, सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच दुहेरी अंकात कमाई करू शकतो असा ट्रेड विश्लेषकांचा अंदाज आहे. रिपोर्ट्सनुसार, सनी देओलच्या 'गदर 2' ची तिकिटे 1 ते 1.5 लाखांच्या आसपास विकली गेली आहेत.

गदरची प्रचंड क्रेझ

एकीकडे 'गदर २' ची प्रचंड क्रेझ असताना दुसरीकडे 'ओह माय गॉड-२'च्या निर्मात्यांना ट्रेलर उशिरा रिलीज झाल्याचा फटका स्पष्टपणे सहन करावा लागला आहे. वृत्तानुसार, अक्षय कुमारच्या सोशल ड्रामा चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये अवघ्या चार दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 70 ते 71 लाखांची कमाई केली आहे.

Gadar 2 vs OMG 2 Advance Booking
Barbie Box Office Collection : 'बार्बी'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई ;पण भारतात मात्र 'ओपेनहायमर'चीच जादू

दोन्ही चित्रपटांची वेगळी शैली

सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रासाठी ओ माय गॉड चित्रपटाला बराच काळ वाट पाहावी लागली होती. अखेर चित्रपटाला A प्रमाणपत्र देण्यात आले. गदर 2 आणि ओह माय गॉड 2 हे दोन्ही पूर्णपणे वेगळ्या शैलीतील चित्रपट आहेत. पण बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी कोणता चित्रपट चांगली कमाई करेल याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com