
पणजी: आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे गोव्याची एक अनोखी ओळख. वर्ष २००४ पासून आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आयोजित केला जातो. बुधवारी २८ नोव्हेंबरला ५५व्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता होणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का गोव्यात या चित्रपट महोत्सवाची सुरुवात नेमकी झाली तर कशी? आत्ताच्या घडीला गोव्यात हा चित्रपट महोत्सव झाला नाही तर जगभरातील सिनेप्रेमींना ही गोष्ट खरी वाटणार नाही, पण मग या महोत्सवाची सुरुवात नेमकी केली तरी कोणी हे आज जाणून घेऊया...
१९५२ मध्ये सर्वात पहिल्यांदा आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची मुंबईमध्ये सुरुवात झाली, भारताकडून आयोजित केलेला हा संपूर्ण आशिया खंडातील सर्वात पहिला चित्रपट महोत्सव होता. यानंतर मात्र महोत्सवाला अनेक जागा बदलाव्या लागल्या, यामध्ये चेन्नई, तिरुअनंतपुरम अशा अनेक शहरांचा समावेश होता.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे रक्षा मंत्री मनोहर पर्रीकर यांचा चित्रपट महोत्सवाला गोव्यात आणण्यात खूप मोठा आणि महत्वाचा वाटा होता. कॅन्स प्रमाणेच गोव्याने देखील एका चित्रपट महोत्सवाचे आयोजन करावे असा दृष्टिकोन ठेऊन पर्रीकरांनी या महोत्सवाची सुरुवात केली.
देश-विदेशातील चित्रपटांना एक पक्कं आणि हक्काचं स्थान मिळावं म्हणून पर्रीकरांनी केलेला प्रयत्न आज बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे. पणजी म्हणजे गोव्याची राजधानी आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाचं आकर्षण केंद्र. इथे अनेक नयनरम्य दृश्य तर आहेच मात्र यासोबत हे शहर आजही गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपतं.
सध्या गोवा सरकारच्या सहकार्याने हा महोत्सव भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (माहिती आणि प्रसारण मंत्रालय) द्वारे आयोजित केला जातो. जगभरातील चित्रपटांचं एकत्र सादरीकरण व्हावं किंवा चित्रपटांच्या दुनियेतील विचारवंतांची एकमेकांमध्ये चर्चा व्हावी म्हणून या महोत्सवाचे आयोजन केलं जातं.
आपण वसुधैव कुटुम्बकम् या शिकवणीवर चालणारी लोकं आहोत त्यामुळे सगळं जगाचं एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊन चित्रपटांच्या अनोख्या उत्सवाचा आनंद घेतं. या महोत्सवाच्या वेळी अनके स्पर्धा आयोजित केल्या जातात तसंच सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने चित्रपटांच्या दुनियेत कामगिरी बजावलेल्या दिग्गजांचा गौरव केला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.