'माझं हिंदू असणं पाप आहे का?' ISRO च्या माजी शास्त्रज्ञांचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

Nambi Narayanan: नंबी नारायणन आपला मुद्दा स्पष्ट करताना आणि विचारताना दिसत आहेत की हिंदू असणे पाप आहे का?
Nambi Narayanan
Nambi Narayanan Dainik Gomantak
Published on
Updated on

Rocketry- The Nambi Effect: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे ( ISRO) माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनी ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ या बायोपिकमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यांच्या हिंदू ओळखीला लक्ष्य करणाऱ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नंबी नारायणन आपला मुद्दा स्पष्ट करताना आणि विचारताना दिसत आहेत की हिंदू असणे पाप आहे का?

व्हिडिओमध्ये काय म्हणाले नारायणन

व्हिडिओमध्ये नंबी नारायणन म्हणतात, 'कधीकधी हे विनोदी वाटतं. कोणीतरी एक समीक्षा लिहिली होती, ज्यामध्ये त्याने म्हटले होते की, नंबी नारायणन यांना हिंदू (Hindu) म्हणून दाखवले आहे. नंबी नारायणन काही उत्सव करत आहेत. सुप्रभात पठण. मी 'ब्राह्मण' आहे; मी हिंदू आहे. हिंदुत्व दाखवले जात आहे. मी तुम्हाला विचारु इच्छितो की, मी हिंदू आहे. म्हणजेच मला हे सांगायला लाज वाटत नाही. मग हिंदू असायला का लाज वाटली पाहिजे?

Nambi Narayanan
Uttar Pradesh:लखनऊमधील लुलू मॉल मध्ये नमाज पठण करणाऱ्या चार जणांना अटक

'हिंदू हूं तो' चित्रपटात दाखवले

नंबी पुढे म्हणाले की, 'मी हिंदू आहे. त्यामुळे चित्रपटातही मला हिंदू म्हणून दाखवण्यात आले आहे. मला मुस्लिम (Muslim) किंवा ख्रिश्चन (Christian) म्हणून दाखवता येत नव्हते.' ते पुढे म्हणाला की, 'मी ब्राह्मण नाही.'

नंबी नारायणन म्हणाले, 'ब्राह्मण असणं पाप आहे का? मी ब्राह्मण नाही, हा वेगळा प्रश्न आहे. जर ब्राह्मण मित्र असेल तर तुम्ही त्याला लहान मानाल का? असे अनेक ब्राह्मण आहेत, ज्यांनी देशासाठी प्राण दिले आहेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com