रोहित शेट्टीने घेतली अमित शहांची भेट

Rohit Shetty meets Amit Shah: अमित शहा (Amit Shah) आणि रोहित शेट्टीचा एक फोटोही समोर आला आहे.
rohit shetty and Amit shah
rohit shetty and Amit shahTwitter
Published on
Updated on

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आहेत. बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने अमित शाह यांची भेट घेतली. अमित शहा (Amit Shah) आणि रोहित शेट्टीचा एक फोटोही समोर आला आहे. या फोटोमध्ये ज्यामध्ये दोघेही कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर गंभीरपणे बोलत आहेत. मात्र, या बैठकीचा उद्देश काय होता, याची माहिती समोर आलेली नाही. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याबद्दल बोलायचे झाले तर ते लालबागचा राजा पाहायलाही जाणार आहेत. आगामी बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अमित शहा यांचा हा दौरा विशेष असल्याचे मानले जात आहे.

बाप्पाचं पूजन झाल्यानंतर अमित शाह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करतील. मुंबई मनपा निवडणुकांसाठी भाजपच्या तयारीचा आढावा घेणे हा त्यांच्या दौऱ्यामागचा मुख्य उद्देश असेल. उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अमित शाह हे भाजप नेत्यांशी आगामी मुंबई महापालिका आणि इतर महापालिका निवडणुकांबाबत चर्चा करणार आहेत.

अमित शाहांचं मराठीतून ट्वीट

गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे. आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होईन. शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवईत नाइक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए एम नाइक विद्यालयाचे उद्घाटन होईल. असे ट्वीट करत अमित शाहांनी माहिती दिली आहे.

कडक पोलिस बंदोबस्त

अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त मुंबई शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. या दौऱ्यानिमित्ताने 4 आणि 5 सप्टेंबर रोजी मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातील काही भागात वाहतुकीचे नियम लागू होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यामुळे 5 सप्टेंबरला सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 12.30 या वेळेत लालबाग, परळ, लोटस जंक्शन, महालक्ष्मी रेसकोर्स, सात रस्ता, चिंचपोकळी जंक्शन, मलबार हिल, केम्प्स कॉर्नर, बाबुलनाथ, हाजी अली, वरळी डेअरी वरळी सी लिंक आणि लीलावती जंक्शन आदी भागात वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

मलबार हिल, गिरगाव चौपाटी, मरीन ड्राइव्ह, रिगल जंक्शन आणि कुलाबा परिसरात सोमवारी दुपारी 2 ते 3 या वेळेत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मरोळ आणि पवई भागात सोमवारी दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या वेळेत निर्बंध असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com