आमिर खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपटातील इशान बघा कसा दिसतोय

तारे जमीन पर फेम इशान म्हणजे दर्शील सफारीचा आज वाढदिवस आहे.
Tare Zameen par fame Darsheel Safari
Tare Zameen par fame Darsheel Safari Insta/dsafary
Published on
Updated on
Tare Zameen par fame Darsheel Safari
Tare Zameen par fame Darsheel Safari Insta/dsafary

एखाद्या चित्रपटातील एखाद पात्र किंवा ती व्यक्ती आपल्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतात. ते पात्र सिनेरसिक खरंखुरं जगतात. आमिर खान जेव्हा 'तारे जमीन पर' (Tare Zameen Par) हा चित्रपट बनवत होता, तेव्हा त्याच्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते मुख्य कलाकार शोधणे, जो बालकलाकार होता. खूप ऑडिशन्स घेतल्यानंतर त्याला दर्शील सफारी (Darsheel Safary) मिळाला आणि त्यानंतर जे घडले त्याचे साक्षीदार तुम्ही आम्ही प्रेक्षक आहोत.

Tare Zameen par fame Darsheel Safari
Tare Zameen par fame Darsheel Safari Insta/dsafary

दर्शीलने 2007 मध्ये 'तारे जमीन पर' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. त्यावेळी तो 10 वर्षांचा होता. पण त्याने साकारलेली भूमिकाही तितकीशी सोपी नव्हती. त्याला लर्निंग डिसऑर्डरमुळे त्रस्त असलेल्या मुलाची भूमिका साकारायची होती.

Tare Zameen par fame Darsheel Safari
Tare Zameen par fame Darsheel Safari Insta/dsafary

आमिरसाठीही हा चित्रपट आव्हानात्मक होता कारण हा त्याने दिग्दर्शीत केलेला पहिलाच चित्रपट होता. दर्शील सफारीने साकारलेली इशानची (Ishaan) भूमिका आणि व्यक्तिरेखा या चित्रपटाचा संपूर्ण केंद्रबिंदू होती. दर्शीलने इशानची भूमिका इतक्या चोखपणे साकारली की त्याला जगभरातून प्रशंसा मिळाली. चित्रपटही चांगला चालला. यासोबतच हा चित्रपट आमिर खानच्या करिअरचा एक मोठा टर्निंग पॉइंट मानला गेला.

Tare Zameen par fame Darsheel Safari
Tare Zameen par fame Darsheel Safari Insta/dsafary

दर्शील आता मोठा झाला आहे. तारे जमीन पर मधील छोटा इशान आता 25 वर्षांचा झाला आहे. दर्शील चित्रपटांपासून दूर राहतो आणि छोट्या प्रोजेक्टमध्ये दिसतो. त्यांने अभिनयाला लगेच बाय-बाय म्हटले नाही, पण गेल्या काही वर्षांत त्यांचे काम फारच मर्यादित राहिले आहे.

Tare Zameen par fame Darsheel Safari
Tare Zameen par fame Darsheel Safari Insta/dsafary

दर्शील सफारीचा जन्म 9 मार्च 1997 रोजी मुंबईत झाला. 2006 मध्ये दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी त्याची दखल घेतली होती. दर्शील त्यावेळी डान्सिंग स्कूलमध्ये नृत्य शिकत होता. अमोलने त्या नृत्यशाळेत सर्वांची ऑडिशन घेतली तेव्हा त्याने एक अट घातली की तिथे असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ते वर्ग कसे बंक करतील हे सांगावे लागेल.

Tare Zameen par fame Darsheel Safari
Tare Zameen par fame Darsheel Safari Insta/dsafary

आणि हे सांगणे एक आव्हान होते. पण दर्शीलने सर्वांना प्रभावित केले. त्याच्यात ते आकर्षण होते. त्याच निरागस रूप आणि हसण्याव्यतिरिक्त, अमोलला एक गोष्ट सर्वात जास्त आवडली ती म्हणजे अमोलला दर्शीलच्या डोळ्यात खोडकरपणा दिसला. आणि तिथेच दर्शीलच्या करिअरची सुरवात झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com