भोजपूरी इंडस्ट्रीमधुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने आत्महत्या केली आहे. या घटनेने मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे.
काल रात्री (25 मार्च) आकांक्षा शूटिंगनंतर हॉटेलमध्ये गेली आणि तिथे आत्महत्या केली. त्यामुळे भोजपूरी चित्रपटसृष्टीवर दुख:ची छाया पसरली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून ते बॉलीवूड आणि आता भोजपुरी सिनेमांपर्यंत सेलिब्रिटींचा मृत्यू झाला आहे.
अलीकडेच बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन आणि अलीकडेच अभिनेत्री नीलू कोहलीच्या पतीच्या निधनाने त्याचबरोबर दिग्दर्शक प्रदीप सरकार यांच्या निधनाच्या बातम्यांनी इंडस्ट्रीला आधीच मोठा सर्वांनाच धक्का बसला होता त्यानंतर आता ही घटना घडली आहे..
एकापाठोपाठ एक असे धक्के बसत असतानाही लोक या धक्क्यातून सावरले नाहीत की आता आकांक्षा दुबेच्या अचानक आत्महत्येच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.
बनारसमधील सारनाथ हॉटेलमध्ये २५ वर्षीय आकांक्षा दुबे हिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. बनारसमध्येच ती तिच्या एका प्रोजेक्टचे शूटिंग करत होती. आकांक्षा दुबेच्या या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही
हॉटेलमध्ये गेल्यावर अचानक असे काय झाले की आकांक्षाने आत्महत्येसारखे पाऊल उचलले? असे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी उर्वरित माहितीची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
आकांक्षा दुबेचा जन्म 1997 मध्ये उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे झाला. 2019 मध्ये 'मेरी जंग मेरा फैसला' या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यात त्याची छोटीशी भूमिका होती. ही भूमिका छोटी असली तरी आकांक्षा त्यात रमली होती. यानंतर आकांक्षाने 'मुझसे शादी करोगी' आणि 'साजन' सारखे चित्रपट केले, जे हिट ठरले.
आकांक्षा दुबेला नृत्य आणि अभिनयाची खूप आवड होती. ती टिकटॉकपासून इंस्टाग्रामपर्यंत अॅक्टिव्ह होती. आकांक्षा दुबे अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडिओ आणि रील इन्स्टाग्रामवर शेअर करत असे. आत्महत्येच्या एक दिवस आधी आकांक्षा दुबेने तिचा एक रील इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.