बिग बॉस फेम एल्विश यादवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याच्या आरोपाखाली एल्विशवर सध्या गुन्हा दाखल झाला असुन सध्या सोशल मिडीयावर त्याचीच चर्चा सुरु आहे. नुकताच एल्विशचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एल्विश राजकारणी मनेका गांधी यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहे.
बिग बॉस ओटीटी 2 सिझनचा विजेता एल्विश यादव सतत चर्चेत आहे. त्यातच आता एल्विश गेल्या दोन दिवसांपासून जास्तच चर्चेत आला. त्त्याचे कारण ठरले त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा.
एल्विशवर एक रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे ज्यामध्ये लोक सापाच्या विषाची नशा करत होते. एवढेच नाही तर त्याच्यावर सापांची तस्करी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात एल्विश यादवचा सहभाग असल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार मनेका गांधी यांनी एक निवेदन जारी करून रेव्ह पार्टी प्रकरणात एल्विश यादवला अटक करण्याची मागणी केली.
या प्रकरणी शुक्रवारी नोएडामध्ये युट्यूबरसह पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदविला होता. त्यानंतर एल्विशने त्याचा या प्रकरणासोबत काहीही संबध नसल्याचे सांगितले आणि सर्व चौकशीला तो पोलिसांना मदत करेल असेही सांगितले.
त्यानंतर आता एल्विशने आणखी एक विधान जारी करत राजकारणी मनेका गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याची पुष्टी केली आहे. एल्विशने यापुर्वी ट्विटमध्ये म्हटले होते की, मनेका गांधी यांनी आरोप केल्याबद्दल माफी मागावी कारण त्याचा यात सहभाग नाही.
त्यानंतर एल्विशने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांने दावा केला आहे की मेनका यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा खराब झाली आहे आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.
व्हिडिओमध्ये एल्विश म्हणाला, 'माझ्यावर आरोप करण्यात आला, मेनका गांधीजींनी मला सप्लायरचे प्रमुख बनवलं. मानहानीची केस होईल , मी त्यांना असं सोडणार नाही. मी हलक्यात सोडणार नाही. आता मी या गोष्टींमध्ये सक्रिय झालो आहे. पूर्वी मला वाटायचं की मी माझा वेळ वाया घालवत आहे. पण प्रतिमा खराब किंवा मलिन झाल्यावर मी त्यांना सोडणार नाही.