City Of Dreams 3 : "पायाचं ऑपरेशन झालं होतं आणि मला चालताही येत नव्हतं"...एजाज खानने सांगितला सिटी ऑफ ड्रिम्स 3 चा तो किस्सा...

बहुप्रतिक्षीत सिटी ऑफ ड्रीम्सचा अभिनेता एजाज खानने शूटींगदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे
City Of Dreams 3
City Of Dreams 3Dainik Gomantak

मोस्ट अवेटेड सिटी ऑफ ड्रीम्स ही वेब सिरीजचा तिसरा भाग खूपच रंजक असणार आहे.26 मे रोजी या सिरीजच्या चाहत्यांची उत्सुकता संपणार आहे. अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर, संदिप सावंत आणि प्रिया बापटसारख्या कलाकारांचा अभिनय आणि गोष्टीतली रंजकता प्रेक्षकांना या वेबसिरीजकडे आकर्षित करण्यात चांगलीच यशस्वी ठरले आहेत.

दोन्ही भागातल्या गोष्टीतल्या धक्कातंत्रानंतर आता लेखक दिग्दर्शक पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या तिसऱ्या भागाच्या शूटींगवेळी पोलिस अधिकाऱ्याची भूमीका साकारणारा एजाज खान मात्र एका भयंकर वेदनेतून जात होता. त्याने ही गोष्ट शेअर केली आहे.

पात्रांना पडद्यावर जिवंत करण्याच्या प्रयत्नात अभिनेते बर्‍याचदा जखमी होतात आणि मग याच आठवणींचे किस्से कायमस्वरूपी त्या कलाकृतींशी जोडले जातात. 'सिटी ऑफ ड्रीम्स सीझन 3' च्या आगामी सीझनमध्ये, तंदुरुस्त आणि धाडसी असणारा पोलिस अधिकारी वसीम खान (एजाज खान) शूटिंग करताना गंभीर जखमी झाला होता, परंतु तरीही याची पर्वा न करता त्याने आपलं काम सुरूच ठेवलं.

त्याच्या दुखापतीबद्दल बोलताना एजाज खान म्हणाला, “सीझन 3 मध्ये, दुर्दैवाने मी माझ्या उजव्या पायाची दोन हाडं मोडली. सुरूवातीच्या सीन्समध्येही तुम्हाला मी लंगडताना दिसेन. मला चालता येत नव्हते.

 माझ्या उजव्या पायाच्या बुटाचा आकार माझ्या डाव्या पायापेक्षा एक आकार मोठा असेल कारण माझा पाय सुजला होता. माझी नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती आणि मला नीट चालता येत नव्हते किंवा धावता येत नव्हते". '

पुढे बोलताना एजाज म्हणाला " पण नागेश कुकुनूर सरांनी, त्याबद्दल खूप सहानुभूती दाखवली . शूटिंगदरम्यान आमच्यासमोर खूप आव्हाने असतात, पण त्यावर मात करण्याचा मार्ग आम्ही शोधतो. आम्ही आमचे शूट थांबवू शकत नाही. दुर्दैवाने गेल्या वर्षी, शूटच्या शेवटच्या काळात सहा महिने, मी खूप दुखापतींचा सामना करत होतो.

मला समजले आहे की मी आता 35-40 वर्षांचा नाही. मला समजते की प्रत्येक गोष्टीला एक लाईफ असते. शरीराच्या सांध्यालाही लाईफ असते. त्यामुळे मला त्याला स्पर्श करायचा नव्हता किंवा त्यावर भारही टाकायचा नाही. मला त्यांना स्पीड द्यायचा होता आणि मी तो दिला.

City Of Dreams 3
New Policy For OTT Content: OTT कंटेट वर झाली संसदेत चर्चा... आता होणार हे नवे बदल

एजाजच्या एवढ्या मोठ्या दुखापतीनंतरही तो शूटींगमध्ये व्यस्त राहिला आणि त्याने आपलं काम व्यवस्थित करुन दिग्दर्शकाचा विश्वास सार्थ केला. तिसऱ्या सीजनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

अतुल कुलकर्णींचं शुद्धीवर येणं, आपल्या मुलाकडे उत्तराधिकारी म्हणुन बघणं आणि प्रिया बापटला या सगळ्याचा राग येणं आणि यापुढचा रंजक भाग नेमका काय असणार याची उत्सुकता तुम्हाला 26 मे पर्यंत ताणावी लागणार आहे. एजाज खानचा पत्नी आणि मुलीचा बदलाही अजुन बाकी आहे पाहुया या सीजनमध्ये नक्की काय होतंय?.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com