Dream Girl 2 Release Date : पुजाच्या चाहत्यांनो थोडी अजुन वाट पाहा...ड्रीम गर्ल 2 या तारखेला होणार रिलीज

आयुष्यमान खुरानाच्या मोस्ट अवेटेड ड्रीम गर्ल 2 या तारखेला रिलीज होणार आहे.
Dream Girl 2 Release Date
Dream Girl 2 Release DateDainik Gomantak
Published on
Updated on

Dream Girl 2 Release Date: अभिनेता आयुष्मान खुरानाची ड्रीम गर्ल आता आपली भेट लांबवणार आहे. 25 ऑगस्ट रोजी ड्रीमगर्ल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'ड्रीम गर्ल' चित्रपटाच्या यशानंतर, त्याच्या दुसऱ्या भागाची घोषणा आधीच झाली होती.

चाहते या चित्रपटाच्या पहिल्या लूकची आतुरतेने वाट पाहत होते. सलमान खानच्या 'किसी का भाई, किसी की जान' या चित्रपटाच्या रिलीजसोबतच निर्मात्यांनी 'ड्रीम गर्ल 2'चा पहिला टीझरही रिलीज केला.

या टीझरमध्ये पूजा उर्फ ​​आयुष्मान खुराना बॉलिवूडचा दबंग सलमान खानशी फोनवर बोलताना दिसत आहे. 'ड्रीम गर्ल 2' च्या टीझरला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

आता चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज केल्यानंतर, आयुष्मान खुरानाने त्याच्या चाहत्यांना एक पत्र लिहिले, ज्यामध्ये त्याने आपला चित्रपट चित्रपटगृहात कधी येणार हे सांगितले.

आयुष्मान खुरानाने काही वेळापूर्वी त्याच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसह एक पोस्ट शेअर केली होती. सोशल मीडियावर या पोस्टसोबतच आयुष्मान खुरानाने सांगितले की, जेव्हा त्याचा आगामी चित्रपट 'ड्रीम गर्ल-2' थिएटरमध्ये रिलीज होत आहे.

पूजाने तिच्या प्रियकरांसाठी एक पत्र पोस्ट केले, ज्यामध्ये तिने लिहिले, 'माझ्या प्रिय प्रियकर, चार वर्षांनंतर पुन्हा तुझ्या हृदयाचा टेलिफोन वाजणार आहे. आता याची तयारीही भव्य आणि असायला हवी, नाही का? तर अजून थोडं थांबा आणि तुमचे भरपूर प्रेम पाठवत राहा. आता 7 रोजी नाही, 25 ऑगस्टला पूजाचा किस'.

Dream Girl 2 Release Date
Top 5 Novel Based Web Series: पुस्तकांच्या पानांवरच्या कथा जेव्हा वेबसिरीज बनतात, कादंबरीवर आधारित या 5 सिरीज पाहाच...

पूजाने म्हणजेच ​​आयुष्मान खुरानाने  या पोस्टसह सांगितले की त्यांचा चित्रपट 25 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. मात्र, या नव्या पोस्टसोबत त्याने लिहिलेली कॅप्शन खूपच विनोदी आहे. आयुष्मान खुरानाने लिहिले, 'पच्चीस बडी है मस्त-मस्त, कारण पूजा ड्रीम गर्ल येत आहे'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com