Divya bharti
Divya bhartiTwitter

दिव्या भारतीने शेअर केला होता अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा

दिव्या भारती तिच्या चाहत्यांना भेटल्यानंतर अनेकदा म्हणायची की हात धुऊ नका. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे होते की दिव्या भारती असे का म्हणते
Published on

दिव्या भारती (Divya Bharti) हे चित्रपटसृष्टीतील प्रख्यात नाव होते, जिला लहान वयात खूप मोठी प्रसिद्धी मिळाली होती. मात्र दुर्दैवाने तिने लहान वयातच जगाचा निरोप घेतला होता. दिव्या भारती जावून आज 28 वर्षे झाली, पण दिव्या भारतीच्या मृत्यूचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.

या दिवशी म्हणजे 5 एप्रिल 1993 रोजी दिव्या भारती अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा येथील तिच्या अपार्टमेंटच्या 5व्या मजल्यावरील बाल्कनीतून (Divya Bharti Death Anniversary) पडली. अभिनेत्रीला कूपर रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. दिव्या भारतीच्या मृत्यूचे अधिकृत कारण डोक्याला गंभीर दुखापत आणि अंतर्गत रक्तस्त्राव असल्याचे सांगण्यात आले. मात्र, दिव्याने आत्महत्या केली की ती चुकून बाल्कनीतून पडली हे स्पष्ट झाले नाही.

Divya bharti
श्रीलंकेतील परिस्थितीवर Jacqueline Fernandez ने व्यक्त केल्या भावना

वयाच्या 19 व्या वर्षी जगाचा निरोप घेणारी दिव्या भारती आज भलेही तिच्या चाहत्यांमध्ये नसेल, पण तिच्याशी निगडीत किस्से आणि तिचा अभिनय तिच्या चाहत्यांच्या हृदयात नेहमीच जिवंत आहे. आज दिव्या भारतीच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही तुम्हाला तिच्या मृत्यूशी संबंधित घटनेबद्दल सांगणार नाही. एखादी व्यक्ती गेल्यावर त्या व्यक्तीशी संबंधित वाईट घटनाच लक्षात राहाव्यात असे नाही. त्या व्यक्तीशी संबंधित चांगल्या गोष्टीही लक्षात ठेवाव्यात. म्हणून एक मनोरंजक किस्सा सांगणार आहोत, ज्यावरून ती आणि तिची आई अमिताभ बच्चन यांची किती मोठी फॅन होती हे दिसून येते.

असे म्हटले जाते की, दिव्या भारती तिच्या चाहत्यांना भेटल्यानंतर अनेकदा म्हणायची की हात धुऊ नका. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे होते की दिव्या भारती असे का म्हणते, मग एकदा स्वतः दिव्याने 1992 मध्ये आलेल्या 'गीत' चित्रपटाच्या सेटवर दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता. एचटीच्या वृत्तानुसार, दिव्याची ही मुलाखत सोनी वाहिनीवर प्रसारित झाली होती. यामागचे कारण दिव्या भारतीने अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचे सांगितले.

Divya bharti
रणबीर कपूर -आलिया भट्टचे एप्रिलमध्ये होणार शुभमंगल?

रिपोर्टनुसार, दिव्या भारती म्हणाली होती की, मी एक रॅली पाहण्यासाठी गेले होते. त्या रॅलीत अमिताभ बच्चन होते. माझे वडील अमिताभ बच्चन यांना ओळखत होते आणि ते त्यांच्याशी खूप आनंदाने गप्पा मारत होते. यानंतर माझ्या वडिलांनी माझी अमिताभ यांच्याशी ओळख करून दिली. त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केले. मी परत आले आणि आईने मला सांगितले की त्या हातांना स्पर्श करू नका, 10 दिवस हात धुवू नका कारण त्या हाताने अमिताभ बच्चन यांनी हस्तांदोलन केले होते. मात्र, मला हात धुवावे लागले आणि मी हात धुतले. आता जेव्हा कोणी हस्तांदोलन करते तेव्हा फक्त मला माझा हा मूर्खपणा आठवतो. म्हणून मी त्यां सगळ्यांना सांगते, 'बघा, तूम्ही माझ्याशी हंस्तांदोनल केले आहे तेव्हा तुम्ही हात धुवू नका, त्या हाताचे चुंबन घेत राहा'.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com