Ayushmann Khurrana: 'या' चित्रपटांसाठी ओळखला जातो आयुषमान खुराना

Ayushmann Khurrana: त्यामुळे त्याचे कमी बजेटचे चित्रपटदेखील कमाईच्या बाबतीत मोठा पल्ला गाठताना दिसतात.
Ayushmann Khurrana
Ayushmann KhurranaDainik Gomantak
Published on
Updated on

Ayushmann Khurrana: आयुष्यमान खुराना हा इंडस्ट्रीमधील एक गुणी कलाकार म्हणून ओळखला जातो. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणून त्याचे नाव घेतले जाते.

कोणत्याही लाइमलाइटमध्ये येण्यापेक्षा आपल्या कामात व्यस्त असण्यावर प्राधान्य देणाऱ्या या अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. चला तर त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याविषयी खास गोष्टी जाणून घेऊयात.

गेल्या १२ वर्षात आयुषमान खुरानाने आपल्या अभिनयातून आणि ज्या आशयाचे तो जे चित्रपट करतो त्यातून प्रेक्षकांचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे त्याचे कमी बजेटचे चित्रपटदेखील कमाईच्या बाबतीत मोठा पल्ला गाठताना दिसतात.

आयुष्मान खुरानाचा जन्म 13 सप्टेंबर 1984 रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव पूनम आणि वडील पी खुराना हे आहे. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या वडिलांना गमावले. आयुष्मानचा भाऊ अपारशक्ती खुराना देखील फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग आहे.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयुष्मानने त्याच्या करिअरची सुरुवात रेडिओपासून केली आणि त्यानंतर रिअॅलिटी शोकडे वळला. होस्टिंग आणि अभिनयासोबतच तो गाणेदेखील उत्तम गातो.

Ayushmann Khurrana
Sheezan Khan: तुनिषा आत्महत्येबद्दल अखेर शिझान बोलला! 'त्यानंतर मी 70 दिवस...'

विकी डोनर या चित्रपटातून त्याला ब्रेक मिळाला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. गेल्या १२ वर्षात त्याने २० चित्रपटात काम केले असून आपली वेगळी छाप बॉलीवूडमध्ये निर्माण केली आहे.

विकी डोनर (२०१२), नौंटकी साला (२०१३), इडियट्स (२०१४), मेरी प्यारी बिंदू (2017), अंधाधुन (२०१८), कलम १५, ड्रीम गर्ल (२०१९), बाला (२०१९), डॉक्टर जी (२०२२), अॅक्शन हिरो (२०२२),ड्रीम गर्ल 2 (2023) अशा अनेक चित्रपटातून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या चित्रपटामुळे आयुषमानची बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com