मोठ्या ब्रेकनंतर या मालिकेत दिसणार 'गोपी बहू'...अभिनेत्री देवोलिनाची एन्ट्री

गोपी बहू म्हणजेच देवोलिना लवकरच या शोमध्ये परतणार असुन नव्या मालिकेत ती एका वेगळ्या भूमीकेत दिसणार आहे
Devolina
Devolina Dainik Gomantak

Devolina Bhattacharjee in new Show : साथ निभाना साथिया फेम गोपी बहू अर्थात देवोलिना भट्टाचार्जीला तिचे चाहते कसे विसरतील. मालिकांमधुन प्रेक्षकांवर आपली छाप पाडणारी देवोलिना गेल्या काही काळापासून इंडस्ट्रीपासून दूर होती.

आता मिळालेल्या अपडेट्सनुसार देवोलिना लवकरच आपल्या चाहत्यांना या मालिकेमधून भेटणार आहे.

चला पाहुया गोपी बहु चाहत्यांच्या भेटीला कधी आणि कुठे येणार आहे?

देवोलिना प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी लवकरच एका मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर देवोलिनाचे चाहते तिच्या भूमीकेबद्दल उत्सुक असणार आहेत.

साथ निभाना साथिया

 'साथ निभाना साथिया' मालिकेतून देवोलिनाने आपली ओळख निर्माण केली होती. तिच्या गोपी या व्यक्तिरेखेने घराघरात प्रसिद्ध झाली होती. ती 'बिग बॉस 15' मध्येही दिसली. तिने काही महिन्यांपूर्वीच शानवाज शेखसोबत लग्न केले.

 देवोलिनाने 'लंच स्टोरीज' सारख्या लघुपटातही काम केले आहे आता ती पुन्हा पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे.

मालिका 10 वर्षांनी पूढे जाणार

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार देवोलिना 10 वर्षांच्या लीपनंतर 'दिल दियां गल्ला'चा भाग होणार आहे. लीप म्हणजे ही मालिका आता 10 वर्षांनी पुढे जाणार आहे.

डेली सोपमधील नवीन पात्र आणि कलाकारांच्या परिचयासह नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे 

प्रसिद्ध टेलिव्हिजन शो 'दिल दियां गल्लन' या शोमध्ये लीप घोषित झाल्यामुळे पात्र आणि मुख्य आणि इतर असे अनेक कलाकार आता मालिकेत दिसणार आहेत. 

देवोलिना दिसणार 'दिशा'च्या भूमीकेत

मिळालेल्या माहितीनुसार नव्या या नव्या पर्वात देवोलिना भट्टाचार्जी दिशा या संगीत शिक्षिकेची भूमिका साकारणार आहे. दिशा हे अशा महिलेचं पात्र आहे जिचा भूतकाळ त्रासदायक आहे आणि ती एक घटस्फोटित आई आहे. 

या शोमध्ये तिला वीरसोबत कास्ट करण्यात आले आहे. शोमध्ये अनेक बदल होणार असून ट्विस्ट अँड टर्न्स असलेले हे कथानक प्रेक्षकांना चकित करणार आहे.

देवोलिना म्हणाली

शोमधील आपल्या नव्या भूमीकेबद्दल बोलताना देवोलीना म्हणाली की ती या शोचा भाग होण्यासाठी खूप उत्साहित आहे. 'ईटाईम्स' शी केलेल्या एका संवादात तिने सांगितले 'हृदयस्पर्शी शोचा भाग बनून मला खूप आनंद होत आहे. 

मालिकेबद्दल बोलताना देवोलिना म्हणाली "कथा नवे वळण घेत आहे पण मला वाटतं दिल दियां गल्लं चा सार तसाच राहील. ती पुढे सांगते की दिशा ही एक अशी व्यक्तिरेखा आहे जी प्रेक्षकांचा अंदाज घेत राहील".

Devolina
'जवान'मधला हॉस्पीटलच्या दुरावस्थेचा तो सीन उत्तरप्रदेशातल्या त्या घटनेवर आधारित? कोण आहेत डॉ. कफिल खान?

मालिकेची कथा

शोमध्ये आलिया ही अमृता आणि वीर यांची मुलगी आहे. आलियाला जन्म देताना अमृताचा मृत्यू झाला. यामुळे वीर मुलापासून विभक्त होतो. 

वीर सोडून इतर सर्वजण तिच्यावर प्रेम करतात म्हणून तिला तिच्या वडिलांच्या प्रेमाची आकांक्षा आहे. अशा वेळी दिशा तिच्या आयुष्यात येते आणि आलियासाठी एक नवीन आशा निर्माण होते.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com